For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मराठी राजभाषा समितीची आज पणजीत जाहीर सभा

03:55 PM May 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
मराठी राजभाषा समितीची आज पणजीत जाहीर सभा
Advertisement

पणजी : गोव्याची राजभाषा मराठी करावी या मागणीसाठी आज शनिवार 23 रोजी सायं. 4.30 वा. राजधानी पणजीतील आझाद मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मराठी राजभाषा निर्धार समितीने सदर सभा आयोजित केली असून राज्यातील सर्व मराठीप्रेमींनी हजेरी लावून ती यशस्वी करावी, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे. कोकणीला जसा राजभाषेचा दर्जा मिळाला तसा दर्जा मराठी भाषेलाही देण्यात यावा, अशी समितीची मागणी असून त्यासाठी गेले वर्षभर समितीने राज्यात अनेक ठिकाणी मेळावे घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती केली आहे.

Advertisement

त्यास चांगला पाठिंबा आणि प्रतिसाद मिळाला असून गोव्यातील जनतेला मराठी राजभाषा झालेली हवी आहे. लोकांनी आता या मराठी राजभाषेच्या लढ्यात सामील व्हावे आणि मराठी भाषेची ताकद दाखवावी, असे समितीने सूचित केले आहे. समितीचे प्रमुख निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर तसेच गो. रा. ढवळीकर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. सभेच्या पूर्वी आझाद मैदानासभोवती व जवळच्या रस्त्यावर प्रथम मिरवणूक फेरी काढण्यात येणार आहे. प्रा. मनोज कामत, दत्ताराम देसाई, अनिता तिळवे यांचे संबोधन जाहीर सभेतून होणार आहे. सभेची तयारी पूर्ण झाली असून पावसाळ्dयापूर्वीची ही सभा असल्याने तिला जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. या सभेला 5 हजार पेक्षा जास्त लोक हजेरी लावतील, अशी खात्री समितीने व्यक्त केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.