For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फोंड्यात भाजपाची आज जाहीर सभा

03:57 PM Apr 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
फोंड्यात भाजपाची आज जाहीर सभा
Advertisement

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस प्रमुख वक्ते

Advertisement

फोंडा : फोंडा मतदारसंघात येत्या 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपाचे उमेदवार रितेश रवी नाईक यांच्या प्रचारार्थ आज सोमवार दि. 6 रोजी फोंडा येथील जुन्या बसस्थानकावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 वा. सुऊ होणाऱ्या या सभेला प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. फोंडा भाजपा मंडळाचे अध्यक्ष हरेश नाईक व इतरांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष विरेंद्र ढवळीकर, कुर्टीचे सरपंच नावेद तहसीलदार, कुर्टी जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर, नगरसेवक आनंद नाईक व दक्षिण गोवा भाजपा सचिव विश्वनाथ दळवी हे उपस्थित होते.

सभेला भाजपा कार्यकर्ते व समर्थक मिळून साधारण तीन हजार लोक उपस्थित राहणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे तसेच भाजपा सरकारमधील अन्य मंत्री व पक्षाचे इतर नेते सभेला उपस्थित राहणार आहेत. आजवरच्या प्रचारात भाजपाला मिळणारा उत्तम प्रतिसाद व एकंदरीत वातावरण पाहिल्यास भाजपाचे उमेदवार रितेश नाईक हे मोठ्या मतांच्या आघाडीने विजयी होतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Advertisement

Advertisement
Tags :

.