महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खाणींना पर्यावरण परवान्यासाठी 18 रोजी डिचोलीत जनसुनावणी

10:50 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राज्यातील खाणी त्वरित सुरू करण्याच्या दृष्टीने सरकारने खाण ब्लॉकना पर्यावरण परवाने देण्याची प्रक्रिया प्रारंभ केली आहे. कायद्यानुसार सदर परवाना देण्यासाठी सार्वजनिक सुनावणी घेणे क्रमप्राप्त असल्याने त्यासंबंधी कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे. या प्रक्रियेचा पहिला भाग म्हणून शिरगाव येथील मोन्त दे शिरगाव खाण ब्लॉकसाठी सोमवार दि. 18 जानेवारी रोजी सार्वजनिक सुनावणी होणार आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने त्यासंबंधी सूचना प्रसिद्ध केली आहे. सर्वण डिचोली येथील झांट्यो क्रीडा संकुलात ही सुनावणी होणार आहे.

Advertisement

पर्यावरण मूल्यांकन अहवाल

Advertisement

मोन्त दे शिरगाव हा खाण ब्लॉक शिरगाव पंचायत परिसरात 95.6712 हेक्टर क्षेत्रफळात पसरलेला आहे. लोकांच्या माहितीसाठी या ब्लॉकचा पर्यावरण मूल्यांकन अहवाल खाण खाते, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधित पंचायतीतही पर्यावरण मूल्यांकन अहवालाच्या प्रती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या ब्लॉकसंबंधी हरकती वा सूचना मांडावयाच्या असतील त्यांनी त्या लेखी स्वरूपात सादर कराव्यात, असे मंडळाकडून कळविण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक सुनावणीवेळी विचार मांडण्यास इच्छुकांना सार्वजनिक सुनावणीस उपस्थित राहण्याची मुभा असेल. खाण खात्याने आतापर्यंत दोन स्तरावर नऊ खाण ब्लॉकचा लिलाव केला असून लवकरच आणखी चार ब्लॉकचा लिलाव करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

Advertisement
Next Article