महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

खरी शिवसेना कोणाची जनेतेने दाखवून दिले

06:43 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबोल

Advertisement

मुंबई / प्रतिनिधी

Advertisement

शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी आपल्या शिवसेनेवर विश्वास ठेवला आहे. शिवसेनेवर भरभरून प्रेम करणाऱ्या मतदारांचे मनापासून आभार मानतो. काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला तो खऱ्या अर्थाने या निवडणुकीत जनतेने शिक्कामोर्तब केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे. ते शिवसेनाचा 58 वा वर्धापनदिन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्यावतीने वरळी डोम येथे साजरा करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते.

हिंदूंचा वारसा सांगण़ाऱ्यांना आज हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटू लागली आहे. त्यांना हिंदूत्वाची अॅलर्जी आली आहे. शिवतीर्थावर भाषण करताना देखील संपूर्ण इंडिया आघाडी होती. आज वर्धापनदिनीही तमाम हिंदू बांधव म्हणण्याची त्यांना हिंमत नव्हती. बाळासाहेबांचा फोटो लावून मते मागण्याचा त्यांना अधिकार नाही, असा हल्लाबोल मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. म्हणून धनुष्यबाण पेलण्याची ताकत मनगटात लागते ती ताकत आपल्या धन्ष्युबाणात आहे. म्हणून लोकांनी आपल्यावर लोकांनी विश्वास दाखवला. लोकसभेच्या सात जागा आपण जिंकलो, आपण आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. माझा आत्मविश्वास होता. पण आता मागचे सगळे विसऊन महायुती मजबूत करायची आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

शिवसेनेचे मूळ मतदारांपैकी 19 टक्के मते मिळाली तर चार टक्के मत त्यांच्याकडे राहिली. मग त्यांचे उमेदवार कसे निवडून आले हे सर्वांना माहित आहे. पण ठाकरेंची हा विजय तात्पुरती सूज आहे. पण सूज काही काळाने उतरते असा टोला शिंदे यांनी लगावला.

आपला स्ट्राईक रेट 47 टक्के

तेरा जागा शिंदेगट आणि उबाठा समोरासमोर लढले त्यात सात जागा आपण जिंकलो. आपला स्ट्राईक रेट 47 टक्के आहे. तर त्यांचा स्ट्राईक रेट आहे 42 टक्के त्यांना तेरा जागेवर 7 लाख मते मिळाली. तर आपल्या तेरा उमेदवारांना 62 लाख मते मिळाली अशी आकडेवारीही मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली. त्यामुळे त्यांच्यापेक्षा खरी शिवसेना कोण हे हे स्पष्ट झाले आहे.

गेल्या 58 वर्षात शिवसेनेची व्यापक भूमिका वाढत गेली. हिदुत्वाचा पुरस्कार करणारी शिवसेना म्हणून लोकप्रिय झाली. म्हणूनच नुकत्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकण, संभाजी नगर हे बालेकिल्ले शिवसेनेने अबाधित राखले. कोकणामध्ये एकही जागा उबाठाला मिळू शकली नाही. ख़र्या शिवसेनेने ठासून विजय मिळविवेवा आहे. कारण परंपरागत मतदार बाळासाहेबांच्या ख़र्या शिवसेनेबरोबर होता, आताही आहे आणि यापुढेही राहील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

बाळासाहेबांनी काँग्रेसपासून शिवसेनेला कायमच दूर ठेवले. मात्र त्यांच्या वारसा सांगणाऱ्यांनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधली. काँग्रेसच्या शिवसेनेला बांधलेली शिवसेना वाचवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी उठाव केला. तो ख़र्या अर्थाने सार्थकी लागला. लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केले. जनतेने आणि मतदारांनी दाखविलेल्या विश्वासाला एकनाथ शिंदे तडा जाऊ देणार नाही, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली.

आज बाळासाहेब असते तर

आज बाळासाहेब असते तर माझ्या तमाम हिंदू बंधू-भगिनींनो असे म्हणाले असते. पण आज शिवसेनेच्या वर्धापनदिनालाही त्यांनी हुंदू बंधू‚भगिनींनो असे म्हटले नाही इतका त्यांनी हिंदुत्वाचा तिटकारा आला आहे. त्यांना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार नाही.गर्वसे कहो हम हिंदू है असे म्हणण्याचे धाडस त्यांच्याकडे नाही,  धनुष्यबाण पेलण्याची ताकत त्यांच्या मनगटात नाही. ती आपल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला चढविला.

जिंकल्याचा दावा ते करत आहेत, मात्र..

आपण जिंकल्याचा दावा ते करत आहेत, मात्र ते कोणाच्या जीवावर जिंकले त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना आणि तत्वांना पुर्ण मुठमाती दिल्याचे शिंदे म्हणाले, उबाठाच्या मिरवणुकीत पाकीस्तानचे झेंडे फडकत होते, इतकेच नाही तर हे हिरवे झेंडे भगव्या झेंड्यावर वार करीत असल्याचे शिंदे म्हणाले. रविंद्र वाकयर यांच्या विजयाबद्दल बोलतात, मात्र वायकर यांचा विजय हा जनतेचा विजय आहे. वायकर यांच्या विरोधी असलेल्या उमेदवाराच्या प्रचारात बॉम्बस्फोटातील आरोपी होता. तर ज्या शहीद करकरे, साळसकर ,कामटे आणि ओंबळे यांनी 26 /11 च्या हल्ल्यात जिवाची बाजी लावत दहशतवाद्यांशी मुकाबला त्या शहीदांच्या बद्दल आज सवाल उपस्थित केला जात असल्याचे शिंदे म्हणाले.येत्या विधानसभा निवडणूकीत उबाठाला त्यांची जागा दाखवुन देऊ असे शिंदे यांनी बोलताना मुंबईत आपल्याला 2 लाख जास्त मिळाल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article