महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सार्वजनिक कंपन्यांचा एप्रिलमध्ये 50 हजार कोटींहून अधिकचा खर्च

06:42 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सार्वजनिक क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांनी चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यातच 50,200 कोटी रुपयांपेक्षा थोडा जास्त भांडवली खर्च केला आहे. हे 2024-25 च्या 7.77 लाख कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाच्या उद्दिष्टाच्या 6.46 टक्के आहे. एका अधिकाऱ्याने या संदर्भात ही माहिती दिली.

Advertisement

मात्र, मागील आर्थिक वर्षाच्या एप्रिल महिन्यात खर्च करण्यात आलेल्या 54,177 कोटी रुपयांपेक्षा ही रक्कम कमी आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी भांडवली खर्चाचे उद्दिष्ट 7.42 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, एप्रिलमध्ये मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा भांडवली खर्च उद्दिष्टाच्या 7.3 टक्के होता.

आगामी काळातही खर्चात वाढ होण्याची शक्यता

पुढे भांडवली खर्चात वाढ होईल. याशिवाय, एप्रिलचे आकडे अजूनही तात्पुरते आहेत आणि सुधारित अंतिम आकडे वाढतील 2024-25 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यातील भांडवली खर्चाचे मोठे योगदान रेल्वे, रस्ते आणि तेल आणि वायू क्षेत्रांचे आहे.

भारतीय रेल्वे आणि क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांनी एप्रिलमध्ये 26,641 कोटी रुपये खर्च केले. यानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने 6,645 कोटी रुपये खर्च केले. तेल आणि वायू क्षेत्रातील पीएसयूमध्ये, ओएनजीसीने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात 2,318 कोटी रुपये, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने 2,423 कोटी रुपये खर्च केले. हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनने एप्रिलमध्ये अनुक्रमे 1,155 कोटी आणि 417 कोटी रुपयांचा भांडवली खर्च केला आहे. ऊर्जा क्षेत्रातील पीएसयू एनटीपीसीने 2,083 कोटी रुपये खर्च केले.

अर्थसंकल्पामधील खर्चाचे उद्दिष्ट

2024-25 च्या अंतरिम अर्थसंकल्पात सर्व सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी 9.01 लाख कोटी रुपयांचे एकूण भांडवली खर्चाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यापैकी 7.77 लाख कोटी रुपये अशा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी गुंतवायचे आहेत ज्यांचे वार्षिक भांडवली खर्चाचे लक्ष्य 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article