For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती
Advertisement

चौके प्रतिनीधी : चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला. एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्याकडून निरीक्षक श्री. राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. गोसावी मॅडम यांनी केले.
या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध आपत्तींच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय तसेच आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाची विविध प्रत्यक्ष प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आली. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात आली.
या प्रशिक्षणाचा लाभ प्रशालेतील १८ मुली, १३ मुले, ७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, असे एकूण १११ विद्यार्थी व कर्मचारी यांनी घेतला. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य ती उपाययोजना करण्याचे महत्त्व समजले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके यांच्या वतीने एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.