For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पं. कडलास्करबुवा स्मारक ट्रस्टतर्फे 8-9 रोजी ‘संगीतोत्सव’

06:30 AM Feb 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
पं  कडलास्करबुवा स्मारक ट्रस्टतर्फे 8 9 रोजी ‘संगीतोत्सव’
Advertisement

बेळगाव :

Advertisement

पं. बी. व्ही. कडलास्करबुवा स्मारक ट्रस्ट यांच्यावतीने बुवांच्या 23 व्या पुण्यतिथीनिमित्त दि. 8 व 9 रोजी संगीतोत्सवाचे आयोजन केले आहे. हे कार्यक्रम शहापूर येथील बी. एम. कंकणवाडी सभागृहात होतील. यासाठी केएलई कॉलेज ऑफ म्युझिक आणि कंकणवाडी आयुर्वेदिक महाविद्यालय यांचे सहकार्य लाभणार आहे.

दि. 8 रोजी सायंकाळी 5.30 वाजता उत्सवाचे उद्घाटन होईल. यानंतर चंदगडचे आदिनाथ पाटील व बेळगावचे प्रभाकर शहापूरकर यांचे शास्त्राrय गायन होणार आहे. दि. 9 रोजी सकाळी 9.30 वाजता कडलास्करबुवा यांच्या शिष्यांचा कार्यक्रम होईल. यात हरिकाका भजनी मंडळ, प्रतिभा आपटे, अनगोळ भजनी मंडळ, रुद्रम्मा याळगी, विजय बांदिवडेकर, जयश्री सवागुंजी आणि मंजुश्री खोत व इतर शिष्य भजन सादर करतील. सर्व शिष्य सामूहिकपणे भैरवी सादर करतील. त्यांना तबला साथ आकाश पाटील, राहुल मंडोळकर, नारायण गणाचारी, जितेंद्र साबण्णावर, सतीश गच्ची, अंगद देसाई व विशाल मोडक करतील. यादवेंद्र पुजार, मुकुंद गोरे, सुरेश सरदेसाई हे संवादिनीची साथसंगत करणार आहेत.

Advertisement

कार्यक्रम सर्वांना खुला असून रसिकांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष गुरुराज कुलकर्णी व सचिव विजय बांदिवडेकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.