समाजात बॅ .नाथ पै ,दंडवतेंच्या विचारांची माणसे असणे आवश्यक
मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांचे प्रतिपादन ; सावंतवाडीत कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला
सावंतवाडी : प्रतिनिधी
प्रत्येक घराघरात बॅ नाथ पै असायला हवेत अशी मानसिकता आजच्या काळात निर्माण होणे आवश्यक आहे. आज समाजामध्ये माणसं एकमेकांना मारताना दिसत आहे .कुठल्याही विद्यार्थ्यांला आपण भविष्यात सामाजिक योगदान द्यायचे आहे असे वाटत नाही. त्यामुळे आजच्या युगात बॅ नाथ पै , दंडवते यांच्या विचारांची माणसे असणे आवश्यक आहे असे मत मानसोपचार तज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे श्रीराम वाचन मंदिर व क्रीडा भुवन आणि सावंतवाडी सहकारी पतपेढी मर्यादित सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प डॉ .पाटकर यांनी गुंफले .यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परुळेकर, संस्थेचे अध्यक्ष प्रसाद पावसकर, कार्याध्यक्ष ऍड संदीप निंबाळकर, सचिव रमेश बोंद्रे ,प्राध्यापक प्रवीण बांदेकर आधी उपस्थित होते. यावेळी समकालीन वास्तव आणि बॅ नाथ पै यांचे मूल्य याविषयी डॉ पाटकर यांनी विचार मांडले. ते म्हणाले , बॅ नाथ पै प्रत्येकाच्या घरात जन्माला यायला हवेत असे प्रत्येकाला वाटते पण आपण प्रत्येक जण आपल्या मुलांकडून वेगळ्या अपेक्षा धरत आहोत. माणसं एकमेकांना मारताना दिसत आहेत हे चित्र वाईट आहे. जेव्हा मी प्रत्येक शाळेत आणि विद्यार्थ्यांना भेटतो तेव्हा तुम्ही कोण होणार असं विचारल्यावर एकही मूल सांगत नाही की मला सामाजिक योगदान द्यायचे आहे. मग, अशावेळी बॅरिस्टर नाथ पै, माजी रेल्वेमंत्री मधू दंडवते यांनी समाजासाठी दिलेले योगदान आठवते. खर तर आज समाजामध्ये ज्यांना काही मिळालं नाही त्यांच्यामध्ये न्यूनगंड तयार होत आहे. असे प्रतिपादित केले .एकंदरीत मानसशास्त्र ते लोकशिक्षण पर्यंतचा प्रवास यावेळी त्यांनी उलघडला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक , साहित्यप्रेमी उपस्थित होते .