पीएसआय नेहा पाटील सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित
कसबा बावड्याची कन्या
"रिव्हॉल्व्हर ऑफ होनर बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच" पुरस्कार प्रदान
महाराष्ट्रातील पुरस्कारप्राप्त पहिली महिला
कोल्हापूर
नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी मधील ६२० पोलीस अधिकारी कॅडेट मध्ये कसबा बावड्याच्या कन्या पीएसआय नेहा गगन पाटील यांनी "रिव्हॉल्व्हर ऑफ होनर बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच" हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवला. त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेत्या ठरल्या असून त्यांनी आणखी तीन पुरस्कार मिळवल्याबद्दल त्यांचे कसबा बावड्यासह सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस ट्रेनिंग अकॅडमी तर्फे शुक्रवारी प्रशिक्षण परेड घेण्यात आली. यावेळी 620 पोलीस अधिकारी कॅडेट मध्ये कसबा बावडा कोल्हापूर येथील पीएसआय नेहा पाटील यांना यशवंतराव चव्हाण ऑल राऊंड कॅडेड बॅच, अहिल्याबाई होळकर बेस्ट वुमन ऑफ द बॅच, बेस्ट इन स्टडी सिल्वर बॅटन या तीन पुरस्कारासह रिव्हॉल्व्हर ऑफ द होनर बेस्ट ट्रेनिंग ऑफ द बॅच हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. हा सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळवण्राया नेहा पाटील या महाराष्ट्रातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. पाटील यांचे शिक्षण बावडा हायस्कूल विवेकानंद कॉलेज व एस एम लोहिया कॉलेज येथे झाले. त्यांचे माहेर व सासर हे कसबा बावडा असून त्यांची वडील एस टी महामंडळात चालक असल्याने आपली मुलगीही खाकी वर्दीत असावी पण महाराष्ट्र पोलिस दलात. हे वडिलांचे स्वप्न मुलगी नेहा पाटील हिने अथक प्रयत्न आणि कष्ट करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पीएसआय पदापर्यंत मजल मारली. नेहाला तिच्या माहेर व सासरचे मोलाचे सहकार्य मिळाले. अभियंता असलेले पती गगन पाटील यांनी पत्नी नेहा पाटील यांना त्यांच्या कारकीर्दीत पूर्ण सहकार्य केले. पीएसआय नेहा पाटील यांच्या यशाची बातमी समजताच त्यांच्या गावी कसबा बावडा येथे नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.