For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पीएसए क्लबचे जलतरण स्पर्धेत यश

10:08 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पीएसए क्लबचे जलतरण स्पर्धेत यश
Advertisement

बेळगाव : कोल्हापूर येथे सावली फौंडेशन आयोजित वीर सावरकर स्मृती चषक निमंत्रितांच्या आंतरराज्य जलतरण स्पर्धेत पीएसए जलतरण संघाने घवघवीत यश संपादन केले आहे. कोल्हापूर येथे झालेल्या या स्पर्धेत रियान्स सिंधूने जी-4 गटात  50 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये सुवर्ण तर 50 मी. बॅकस्टोकमध्ये रौप्य तर 200 मी. वैयक्तिक मिडले रिलेमध्ये रौप्य, 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य पदक पटकाविले. पार्थ जाधवने याच गटात 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य पदक, सृष्टी कंग्राळकरने जी-1 गटात 100 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये व 100 मी. फ्रिस्टाईलमध्ये दोन कास्य, सर्मिष्टा माळीने जी-2 मध्ये 100 मी. बटरफ्लॉय व 100 मी. फ्रिस्टाईलमध्ये दोन कास्य, यश पिजोलीने 100 मी. बटरफ्लॉयमध्ये रौप्य तर  100 मी. फ्रिस्टाईलमध्ये कास्य पदक पटकाविले.

Advertisement

सिद्धार्थ कुरंदवाडने याच गटात 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य, दर्शने 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य, आर्या रासलकर जी-4 गटात 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य पदक, ओम पटुकाळेने 50 मी. बटरफ्लॉय व 50  मी. ब्रेस्टस्टोकमध्ये दोन कास्य तर 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य, यश पटुकाळेने 50 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये कास्य तर 50 मी. फ्रिस्टाईलमध्ये रौप्य, सायली घुग्रेटकर, रिहा पोरवाल, सान्वी जाधव, प्रार्थना वकुंदने जी-6 गटात 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य, रेहा पोरवालने 50 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये तर 50 मी. फ्रिस्टाईलमध्ये व 200 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये 3 कास्य, शौर्या कुरुंदवाडने 50 मी.  फ्रिस्टाईलमध्ये कास्य, स्वरा वांगीकरने 200 मी. मिडलेमध्ये कास्य, उनत्ती वांगेकरने 50 मी. बॅकस्टोक व 50 मी. ब्रेस्टस्टोकमध्ये दोन कास्यपदक पटकविले. तर निपाणीच्या आयुषी बालेबालदारने 4×50 मी. फ्रिस्टाईल रिलेमध्ये कास्य पदक पटकाविले. तर या सर्व जलतरणपटूंना प्रशिक्षक विरु गवळी, एनआयएस प्रशिक्षक संदीप मालाई व प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.