क्रीडा क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजपा शासनाने शनिवारी 2025-26 कालावधीसाठी केंद्रिय अर्थसंकल्प सादर केला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी या अर्थसंकल्पामध्ये क्रीडा युवजन खात्याच्या बजेटमध्ये 350 कोटी रुपयांची वाढ केली आहे.
आता केंद्रिय क्रीडा युवजन मंत्रालयासाठी या अर्थसंकल्पात एकूण 3794.30 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या तरतुदीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राला आगामी काळामध्ये अधिक चालना अपेक्षित आहे. शासनाच्या खेलो इंडिया कार्यक्रमाला तळापासून खेळाडूंच्या निवड प्रक्रियेला आता अधिक चालना मिळणार आहे. आगामी एक वर्षांच्या कालावधीत ऑलिम्पिक, राष्ट्रकुल किंवा आशियाई क्रीडा स्पर्धा होणार नसल्याने या क्षेत्रासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा खेळाडूंना अधिक फायदा होईल, अशी आशा क्रीडा युवजन खात्याचे मंत्री मनसुख मांडविया यांनी व्यक्त केली आहे. देशातील विविध भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रांमध्ये (साई) विविध राष्ट्रीय सराव शिबिरे घेतली जातात. खेळाडूंना या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. या प्रक्रियेसाठी आता साईसाठी लागणाऱ्या रकमेमध्ये वाढ केली आहे.