For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कठोर कायद्याची तरतूद करा

10:36 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
कठोर कायद्याची तरतूद करा
Advertisement

बार असोसिएशनचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : हुबळी येथे एकतर्फी प्रेमातून विद्यार्थिनीची हत्या केली. ही घटना अत्यंत गंभीर आहे. कायद्यातील पळवाटांमुळे अशा घटना वाढत आहेत. तेव्हा कायद्यामध्ये कठोर तरतूद करावी, या मागणीसाठी बेळगाव बार असोसिएशनतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. नेहा हिरेमठ हिची नराधम फैयाज याने हत्या केली. या प्रकारामुळे विद्यार्थिनींमध्ये तसेच महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महिला असुरिक्षत झाल्या आहेत. राज्यामध्ये अशा घटना वाढत आहेत. तेव्हा महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायद्यामध्ये बदल करून कठोर कायदे अंमलात आणावेत, असे या निवेदनात म्हटले आहे.

गांभीर्याने विचार करण्याची मागणी

Advertisement

संशयित आरोपीला कठोर शिक्षा करावी. जेणे करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. राज्य सरकारने तातडीने नवीन परिणामकारक कायदा केल्यास महिलांना व तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करावा. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर, जनरल सेव्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे, ज्येष्ठ वकील ए. आर. पाटील, अॅड. विनायक सावजी, अॅड. होनमनी, अॅड. बी. पी. जेवनी यांच्यासह इतर वकील उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.