कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एमएसएमई टेक-पार्कसाठी जागा उपलब्ध करून द्या

12:03 PM Nov 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडींची प्रशासनाला सूचना : अनेक विकासकामांबाबत चर्चा

Advertisement

बेळगाव : भारत सरकारच्या एमएसएमई विभागाकडून बेळगावमध्ये एमएसएमई टेक-पार्क बांधले जाणार आहे. यासाठी दहा एकर जागेची आवश्यकता आहे. जागेची पूर्तता करण्यासाठी राज्यसभा सदस्य खासदार इराण्णा कडाडी यांनी जिल्हा उद्योग केंद्र तसेच मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत नुकतीच चर्चा केली. इराण्णा कडाडी यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान बेळगाव परिसरातील अनेक विकास कामांबाबत चर्चा झाली. सध्याच्या ईएसआय हॉस्पिटलची इमारत जीर्ण झाली असल्याने यमनापूर येथील क्लिनिकमध्ये तात्पुरते स्थलांतर करावे. तसेच कर्मचारी वसतिगृहाच्या नूतनीकरणासंदर्भात चर्चा झाली. उद्योगांचा विकास करण्यासोबत नवीन उद्योग आणण्यासाठी जागेची आवश्यकता असून महानगरपालिका तसेच केआयडीबी व डीआ सीने जागेचा शोध घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी महानगरपालिकेच्या आयुक्त शुभा बी., जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक सत्यनारायण भट, हुबळी येथील एमएसएमईचे सहसंचालक शिवकुमार, केआयएडीबीचे अभियंता मुकुंद वाळवेकर, ईएसआय हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक मंजुनाथ कळसन्नावर यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article