For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या

11:03 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती द्या
Advertisement

जिल्हा बांधकाम कामगार संघटनेची मागणी : कामगार खात्याच्या कार्यालयाला धडक

Advertisement

बेळगाव : मागील दोन वर्षांपासून बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या शासकीय सुविधा ठप्प झाल्या आहेत. विशेषत:कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती, लॅपटॉप आणि विवाह निधीही थांबला आहे. त्यामुळे बांधकाम कामगार अडचणीत आले आहेत. तातडीने या सुविधा बांधकाम कामगारांना मंजूर करा, अशी मागणी जिल्हा बांधकाम कामगार संघटनेतर्फे करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन मजगाव येथील कामगार खात्याच्या उपायुक्तांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठी आहे. मात्र या कामगारांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. बांधकाम कामगारांच्या मुलांना मिळणारी शिष्यवृत्ती आणि लॅपटॉप वितरण ठप्प झाले आहे. त्यामुळे गोरगरीब बांधकाम कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याबरोबर कामगारांना घर बांधण्यासाठी मिळणारा निधीही स्थगित झाला आहे. त्यामुळे घरकुलाचे स्वप्न बघणाऱ्या कामगारांचे स्वप्न अधुरे राहिले आहे. बांधकाम कामगार मुलांच्या विवाहासाठी मिळणारा निधी काही जणांना मिळाला आहे. मात्र उर्वरित कामगार 2016 पासून या निधीच्या प्रतीक्षेत आहेत. बांधकाम कामगारांचा दर्जा उंचावावा यासाठी कामगार कल्याण निधीतून विविध सुविधा पुरविल्या जातात.

सुविधा पुरविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष

Advertisement

मात्र, मागील काही वर्षांपासून या सुविधा पुरविण्याकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे बांधकाम कामगारांना शासकीय सुविधांपासून दूर रहावे लागले आहे. तातडीने बांधकाम कामगारांना सुविधा आणि योजना पुरवून दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.