शेतीचे पंचनामे करून जलद नुकसान भरपाई द्या
अन्यथा आंदोलन छेडू ; वेंगुर्ला ठाकरे शिवसेनेचे तहसीलदारांना निवेदन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले तालुक्यात २० ऑक्टोबर पासून सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत असून कापणीला आलेले भातपीक शेतात पडून त्यास कोंब आले आहेत . शेतीचे अतोनात नुकसान झाले असून निसर्गाने शेतकऱ्यांची वर्षाची पुंजी जी त्यांना वर्षभर संसार चालविण्यास महत्वाची ठरते तो घास हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या या नुकसानीचे पंचनामे कृषी विभाग व महसुल यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ करून त्यांना नुकसान भरपाईही त्वरीत द्यावी अन्यथा वेंगुर्ले तहसिलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या सहभाग ठाकरे शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा अशा ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ला तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी प्रक्षाच्या माध्यमातून लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.वेंगुर्ले तहसिलदारओंकार ओतारी यांना ठाकरे शिवसेनेतर्फे देण्यात आलेल्या लेखी निवेदनात, दि २० ऑक्टोबर २०२५ पासून आपला वेंगुर्ले तालुक्यामध्ये सतत मुसळधार पाऊस लागत आहे व आपल्या तालुक्यातील भातशेती कापणीचे काम है शेतकऱ्यांचे जोरात सुरू होते. परंतु हया सतत मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हया निसर्गाने हिराऊन नेला आहे. तरी सदर भातशेती ही कापणी पूर्व जाग्यावर कोंब आल्यामुळे व शेती शेतात मोडून पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. तरी कृषीविभाग व आपली महसुल यंत्रणेच्या माध्यमातून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी. तसेच भरपाई न दिल्यास शिवसेना आपल्या कार्यालयासमोर ठाकरें शिवसेनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. असा इशारा ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब यांनी पश्नाच्या माध्यमातून दिला आहे. सदरचे लेखी निवेदन वेंगुर्ले तहसिलदार ओंकार ओतारी यांना ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ले तालुका प्रमुख यशवंत परब यांनी सादर केले. यावेळी उपस्थित ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांत उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संदेश निकम, उभादांडा विभाग प्रमुख सुजीत चमणकर माजी नगरसेवक तुषार सापळे, तुळस विभाग प्रमुख संदिप पेडणेकर, उपतालुका प्रमुख उमेश नाईक, चंद्रकांत वालावलकर, मनोहर येरम आदी उपस्थित होते.