कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रेवतळे जिल्हा परिषद शाळेस कायमस्वरूपी शिक्षक द्या

04:51 PM Mar 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पालकांचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवदेन

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

Advertisement

गुणवंत विद्यार्थी घडविणारी शाळा म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेल्या शहरातील रेवतळे जिल्हा परिषद शाळेस कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी पालकांनी आज पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर व गटशिक्षणाधिकारी संजय माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. शिक्षकाची नियुक्ती न झाल्यास आम्हाला आंदोलन उभारावे लागेल असा इशारा यावेळी पालकांनी दिला. जिल्हा परिषद रेवतळे प्रशालेत कार्यरत असलेल्या शिक्षिका या ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्या. परंतु आजपर्यंत या प्रशालेत कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करुन देण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत प्रशालेत केवळ एकच शिक्षक पाच वर्ग सांभाळत आहेत. प्रशालेची पटसंख्या विचारात घेता कायमस्वरूपी शिक्षकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. या प्रशालेतून मागील वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. त्यामुळे आज शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश शिरोडकर, तुषार तळवडेकर, महादेव घोडके, माधुरी दाभोळकर, वर्षा पराडकर, भगवान गावकर, जयंत मसुरकर, प्रसन्न कांबळी, दत्ता पिंगुळकर, संदीप पारकर या पालकांच्या शिष्टमंडळाने गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, गटशिक्षणाधिकारी संजय माने यांना निवेदन सादर करत कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. याची लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन उभारू असा इशारा पालकांनी दिला. दरम्यान पालकांच्या भावना जाणून घेत प्रशालेस कायमस्वरूपी शिक्षक उपलब्ध करुन दिला जाईल असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg# news update # konkan update # marathi news #
Next Article