For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कोलगाव साईनगर कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून न्याय द्या

04:08 PM Mar 08, 2025 IST | अनुजा कुडतरकर
कोलगाव साईनगर कॉलनीतील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून न्याय द्या
Advertisement

कोलगाव ग्रामस्थांचे संजू परब यांना निवेदन

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

सावंतवाडी - कोलगाव साईनगर कॉलनीमध्ये एका विशिष्ट समाजातील व्यक्तीने या भागात येणारा जाणारा रस्ता बंद केला आहे. हा रस्ता वाहतुकीस खुला करावा अशी मागणी वारंवार करून सुद्धा त्या विशिष्ट समाजातील मंडळी दुर्लक्ष करत आहेत. या मंडळींना कोणी तरी पाठीशी घालत आहे . ग्रामपंचायत या भागातील 42 प्लॉटधारकांकडे का दुर्लक्ष करत आहे असा सवाल या भागातील नागरिकांनी करत सदरचा रस्ता खुला करून मिळावा आणि आम्हाला न्याय द्यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा माजी नगराध्यक्ष संजू परब दिले आहे . यावेळी संजू परब यांनी रस्त्यावर केलेले अतिक्रमण काढून टाकण्यात येईल व सर्वांना आपण न्याय मिळवून देणार असे आश्वासन दिले. साईनगर कॉलनी मध्ये प्लॉटधारक मोठ्या संख्येने आहेत. मात्र, तेथे काही मंडळींनी शासनाच्या योजनेतून घरकुल उभारले आहे आणि सदरचा रस्ता येण्याजाण्यास बंद केला आहे. हा रस्ता ग्रामपंचायत यादीमध्ये असताना सदर व्यक्तीने कसा काय बंद केला याबाबत आम्ही वारंवार प्रशासनाकडे विचारणा करूनही तसेच ग्रामपंचायतीकडे अतिक्रमण हटवण्याबाबत कळवूनही कोणतीच दखल घेतली गेली नाही . मात्र तहसीलदारांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे असे लेखी दिले असताना आमच्या मागणीकडे कानाडोळा केला जात आहे. आम्हाला हा रस्ता खुला करून द्यावा अशी मागणी या ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे . यावेळी ग्रामस्थ राजेश गोंदावळे, ऋषीराज सामंत, गजानन देऊसकर, नितीन उरणकर, संतोष केळुसकर, शुभांगी तेंडुलकर, रेश्मा मेस्त्री, सिद्धराम नागुरे, वनिता उरणकर, महादेव साळवी, दत्ताराम स्वार, भास्कर मेस्त्री आदी उपस्थित होते.यावेळी श्री परब म्हणाले विशिष्ट समाजातील जर मंडळी स्थानिकांवर अन्याय करत असतील आणि त्याला जर कोणी वरदहस्त देत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही तसेच निश्चितपणे हा रस्ता खुला करण्यास भाग पाडू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले .

Advertisement

Advertisement
Tags :

.