For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोहयोतून नागरिकांना कामे उपलब्ध करून द्या

10:55 AM Jun 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रोहयोतून नागरिकांना कामे उपलब्ध करून द्या
Advertisement

जि. पं. कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांची बैठकीत सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून घेतला योजनांचा आढावा

Advertisement

बेळगाव : रोजगार हमी योजनेंतर्गत 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या वर्षांमध्ये प्रत्येक ग्राम पंचायतीच्या व्याप्तीमध्ये रोहयोंतर्गत घेण्यात आलेली कामे अपूर्ण आहेत. सदर कामे पूर्ण करावीत, अशी सूचना जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केली. जि. पं. कार्यालयात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. तालुका पंचायत अधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधून योजनांचा आढावा घेतला. जिल्ह्यामध्ये पाऊस अद्यापही पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे नागरिकांना रोहयो योजनेंतर्गत कामे उपलब्ध करून देण्यात यावीत, अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.

नियमानुसार करवसुली करा

Advertisement

प्रत्येक विभागानुसार ग्रामीण बाजारपेठांचे ठिकाण निश्चित करून आठवडाभरामध्ये क्रिया योजना जिल्हा पंचायतीला सादर करावी. ग्रा. पं. व्याप्तीमधील मालमत्तांचा सर्वेक्षण करून पी-2 अहवाल अपडेट करण्यात यावा. ग्रा. पं. व्याप्तीतील मालमत्तांची करवसुली प्रक्रिया अभियान राबविण्यासाठी सरकारकडून यापूर्वीच सूचना केली आहे. नियमानुसार करवसुली करण्यात यावी, अशी सूचना पीडीओंना केली.

अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची  कारवाई करू

सकाल योजनेंतर्गत दाखल करण्यात आलेले अर्ज निकालात काढण्यात यावेत.कालावधी पूर्ण झालेले अर्ज दोन दिवसांमध्ये निकालात काढून त्यांचा अहवाल देण्यात यावा. कोणतेही कारण सांगून अर्ज प्रलंबित ठेवण्यात येऊ नयेत. अन्यथा संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करू, असा इशाराही त्यांनी दिला. पीडीआय प्रक्रिया येत्या चार दिवसांमध्ये पूर्ण करण्यात यावी. पाळणाघर जलमित्र सर्वेक्षण त्वरित पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

कचरा संकलनाचे काम सुरळीतपणे पार पाडा

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रा. पं. व्याप्तीमध्ये दररोज कचरा संकलन करण्याचे काम सुरळीतपणे पार पाडावे. ओला व सुका कचरा याचे विघटन करून कचऱ्याची नियोजनबद्धरीत्या विल्हेवाट लावण्यात यावी. वैयक्तिक शौचालयांची पाहणी करून अहवाल देण्याची सूचनाही त्यांनी केली. यावेळी जि. पं. उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक, बसवराज अडवीमठ, योजना निर्देशक रवी एन. बंगारेप्पन्नवर, मुख्य योजनाधिकारी गंगाधर दिवटर, ग्रामीण उद्योग आणि पंचायत राज खात्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.