For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी सैनिकांप्रमाणे निवृत्त पोलिसांना आरोग्य सेवा घा

05:33 PM Mar 05, 2025 IST | Radhika Patil
माजी सैनिकांप्रमाणे निवृत्त पोलिसांना आरोग्य सेवा घा
Advertisement

सांगली : 

Advertisement

नोकरीत असताना सण समारंभावेळी बंदोबस्ताला रस्त्यावर, जातीय दंगली आणि मोर्चे, आंदोलनावेळी वेळकाळ विसरून सेवा, कोणतीही परिस्थिती हाताळायची तर पोलीस सैनिकाप्रमाणे सदैव दक्ष हवा. मग ५८ वर्षानंतर निवृत्त होताच त्याचा हात का सोडता? माजी सैनिकाप्रमाणे निवृत्त पोलिसाला देखील वैद्यकीय सेवेचा लाभ द्या. आयुष्यभर झटून तो थकतो तेव्हा सरकार त्याच्या मदतीला येणार नाही तर कधी? किमान पती, पत्नीला तरी हा लाभ द्या, ही हाक आहे राज्यातील हजारो निवृत्त पोलिसांची. सांगलीतील निवृत्तांनी नुकतीच ही व्यथा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर मांडली.

निवृत्त पोलिसांतील काही मंडळींची सध्या लगबग सुरू आहे ती ७ मार्चच्या कार्यक्रमाची सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्था सांगली (महाराष्ट्र राज्य) या नावाने त्यांनी एक संस्था सुरू केली आहे. जिल्ह्यातील ५०० निवृत्त पोलिस त्यांचे सदस्य असून ७ रोजी कृष्णा मॅरेज हॉल, पोलिस मुख्यालय सांगली येथे त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन केले आहे. निवृत्त पोलिसांना वैद्यकीय सेवा, त्यांच्या मुलांसाठी सर्व जातीधर्मीय मोफत वधू वर सूचक केंद्र आणि इतर प्रश्रांवर विचार विनिमय करण्यासाठी, समस्या आणि त्यावरील उपाय जाणून घेण्यासाठी डी सभा आयोजित केली आहे. ज्याला जिल्हा पोलिस प्रमुखांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

पण त्यापूर्वी राज्यातील पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या एका जिव्हाळ्याच्या प्रश्नावर त्यांनी काम सुरू केले आहे. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र सरवदे, उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी त्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सेवेसाठी वेळेचे बंधन नसल्याने पोलीसांना कोणत्याही प्रकारचे घरातील अथवा सार्वजनिक सण उत्सव साजरे करता येत नाहीत. जातीय दंगली, गंभीर स्वरुपाच्या आपत्ती इत्यादी मुळे कायदा व सुव्यवस्था राखणे महत्त्वाचे असल्याने पोलीस त्याचे कर्तव्य सेवानिवृत्त होईपर्यंत निष्ठेने पार पाडीत असतो. कठोर परिस्थितीत कर्तव्य पार पाहून वयाच्या ५८ व्या वर्षी बकलेल्या शारिरीक आजाराने त्रस्त अवस्थेत सेवानिवृत्त होतो. सेवानिवृत्तीनंतर अनेक गंभीर आजाराने बरेच कर्मचारी आजारी पडतात. अशा परिस्थितीत त्यांना अपुऱ्या पेन्शन मधुन उपचार घेणे आर्थिकदृष्टया परवडत नसल्याने उपचाराअभावी बरेच सेवानिवृत्त पोलीस मृत्युमुखी पडलेत. सरकारने त्यांच्याबाबतीत एक धोरण आखण्याची गरज आहे.

केंद्रीय सुरक्षा दलातील जवानांना सेवानिवृत्तीनंतरही मोफत आरोग्य सुविधा पुरविण्यात येते. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस दलातील सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र पोलीस कुंटूंब आरोग्य योजनामध्ये समाविष्ठ केल्यास त्यांना गंभीर स्वरुपाच्या आजारावर उपचार घेता येतील व सोईचे होईल.

सेवानिवृत्ती नंतरही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना कार्यरत पोलीसांप्रमाणे महाराष्ट्र पोलीस कुंटुंब आरोग्य योजना सेवानिवृत्ती नंतर सुध्दा लागु करावी. यासाठी आम्ही पालकमंत्र्यांना भेटलो. त्यांनी आस्थेवाईकपणे आमचे म्हणणे जाणून घेतले. शासनाने याकडे लक्ष द्यावे म्हणून राज्यभरातील सेवानिवृत्त संघटना कार्यरत राहील. 

  • शुक्रवारी सर्वसाधारण सभा

निवृत्त पोलीस कर्मचायांच्या विविध प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार विनांक ७ मार्च रोजी सकाळी साडेवहा वाजता कृष्णा मॅरेज हॉल येथे होणार आहे. पैकी वहा गुंठे पोलिसांच्या मुलांसाठी अकॅडमी कम्युनिटी हॉल आणि इतर प्रशिक्षणासाठी द्यावी, पोलीस लाईन येथील ववाखान्यात मोफत औषध उपचार व्हावेत, राज्य शासनाने माजी सैनिकांप्रमाणे निवृत्त पोलिसांना वैद्यकीय सुविधा द्याव्यात याबाबत विचार विनिमय तसेच सर्व जाती धर्मीय पोलीस वधू वर सूचक मंडळ मोफत चालवणे, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर संस्थेमार्फत पाच हजार रुपये वेण्याची योजना सुरू करणे आवी विषयावर चर्चा होईल, वहा, वीस आणि तीस वर्षानंतरच्या बढ़ाती आणि त्यासंबंधी मागण्याबाबत मुकुव डायमा हे मार्गवर्शन करणार आहेत. जिल्हा पोलीस प्रमुख, अप्पर प्रमुख यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती राजेंद्र सरववे आणि अशोक पाटील यांनी दिली. 

 

Advertisement
Tags :

.