For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बालक-गर्भवतींना सुविधा पुरवा

10:35 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बालक गर्भवतींना सुविधा पुरवा
Advertisement

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना

Advertisement

बेळगाव : बालक आणि गर्भवती महिलांना आरोग्य आणि मूलभूत सुविधा तातडीने पुरवाव्यात, अशा सूचना जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केल्या आहेत. जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण कार्यालयात गुरुवारी जिल्हा आरोग्य संघ आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. सार्वत्रिक लसीकरण मोहिमेमध्ये एकही बालक वंचित राहणार नाही, याबाबत आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी. क्षयरोग व कुष्ठरोगाचे तातडीने निदान करून उपचार करावेत. साप व कुत्रा चावलेल्या रुग्णांसाठी प्रतिरोधक औषधांचा साठा उपलब्ध करावा. डेंग्यू, कांजिण्या, कुष्ठरोग आणि मलेरियाचे संसर्ग वाढू नयेत, यासाठी वेळोवेळी सर्वेक्षण हाती घ्यावे. आजारांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्य आणि इतर कर्मचाऱ्यांनी खबरदारी घ्यावी. पाण्याची चाचणी आणि गुणवत्ता काटेकोर तपासावी. याबाबतचा अहवाल ग्रा.पं.ना सादर करावा. आयुष्मान भारत, पंतप्रधान जनारोग्य आदी कार्डे प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रशासन प्रयत्न करीत आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमप्रसंगी जिल्हा  आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, खात्याचे डॉ. व्ही. व्ही. शिंदे, अप्परजिल्हा आरोग्याधिकारी एस. एस. गडद यासह अधिकारी, नर्स व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.