महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

हडलगा गावासाठी बस सुविधा उपलब्ध करा

11:06 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर बस आगार प्रमुखांना निवेदन

Advertisement

वार्ताहर /नंदगड

Advertisement

हडलगा गावासाठी बेकवाडमार्गे बस सुविधा उपलब्ध करा, या मागणीसाठी हडलगा ग्रामस्थांनी सोमवारी खानापूर बस आगार प्रमुखांना निवेदन सादर केले. हडलगा, बंकी, बसरीकट्टी आदी गावातील मुले माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणासाठी नंदगड, खानापूर, बेळगाव येथे जातात. सध्या या विद्यार्थ्यांना व संबंधित गावातील जनतेला तीन किलोमीटर चालत बेकवाड क्रॉसवर येऊन बस गाठावी लागते. लहान विद्यार्थ्यांना सकाळ, संध्याकाळ शारीरिक श्रम घ्यावे लागत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळही वाया जात असल्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. किमान शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत बस सुविधा करावी, अशी मागणी करण्यात आली.

वरील गावातील जनतेला आठवड्याचा बाजार, बँक, दवाखाना व अन्य कामासाठी नंदगड व खानापूरला यावे लागते. बसअभावी महिला, वृद्ध व जनतेची गैरसोय होत आहे. त्यासाठी बस सुविधा उपलब्ध करणे गरजेचे आहे. या मागणीचे निवेदन खानापूर बस आगार संचार निरीक्षक व्ही. वाय.कांबळे यांनी स्वीकारून लवकरच संबंधित गावाला भेट देऊन बसची सोय करून देण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना बेकवाड ग्रा. पं. अध्यक्षा मोहिनी यळ्ळूरकर, सदस्य परशराम मडवाळकर, नामदेव कोलेकर, नंदगड उत्तर पिकेपिएसचे अध्यक्ष कल्लाप्पा मडवाळकर, तानाजी कोलेकर, परशराम मडवाळकर, मोहन यळळूरकरसह हडलगा, बंकी, बसरिकट्टी गावातील पालक-नागरिक हजर होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article