For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहासाठी तात्काळ नवीन फ्रीजर द्या

04:27 PM Jun 05, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहासाठी तात्काळ नवीन फ्रीजर द्या
Advertisement

रुग्ण कल्याण समिती सदस्य देव्या सूर्याजींची मागणी

Advertisement

सावंतवाडी 

उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहात तीन वर्षांपूर्वी नव्याने बसविण्यात आलेला फ्रिजर कुलिंग देत नसल्याने बंद पडत आहे. त्यामुळे आपत्काळात मृतदेह ठेवायचा कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला असून याची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी श्री.देव्या सुर्याजी यांनी केली आहे‌. याबाबतची माहिती त्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

Advertisement

उपजिल्हा रुग्णालयाच्या शवागृहातील बंद फ्रिजर युवा रक्तदाता संघटनेच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती करण्यात आला होता. परंतु, तीन वर्षात शवागृहातील हा फ्रिजर कुलिंग देत नसल्याने तो कुचकामी ठरत आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री मृतदेह ठेवायचा कुठे,असा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णांच्या नातेवाइकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.कालच घडलेला प्रसंग दुपारी १ वाजता शव फ्रिजमध्ये ठेवण्यात आले होते पण रात्री १२ वाजता कुलिंग बंद पडल्याने आयत्यावेळी रुग्णालय प्रशासन कडून शव हलविण्यास सांगण्यात आले आयत्यावेळी च्या प्रसंगामुळे नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.पार्श्वभूमीवर तात्काळ नवीन फ्रीजर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दयावा अशी मागणी श्री. सुर्याजी यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे‌.

Advertisement
Tags :

.