तिलारी- कोल्हापूर राज्यमार्गासाठी १५ कोटींचा निधी द्या
आमदार दीपक केसरकरांची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जिल्हा मार्गावर राज्यमार्ग हे सुस्थितीत आणि दर्जेदार असावेत. त्यांची डागडुजी व्हावी. बहुतांशी रस्ते खराब झाले आहेत त्यांना दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावा. तसेच तिलारी, घोडगेवाडी, मोर्ले पारगड ,कोल्हापूर या रस्त्याच्या कामासाठी १५ कोटीचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बजेट मधून मिळावा अशी मागणी सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन केली आहे.यावेळी श्री केसरकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हयातील तिलारी ,घोडगेवाडी, मोर्ले पारगड, कोल्हापूर रस्ता (जुना रा.मा. 131) नवीन रा.मा. 187 या रस्त्याच्या मंजूर कामांसाठी अर्थसंकल्पीय मार्च २०२६ बजेट निधी अंतर्गत निधीची तरतूद करण्याबाबत निर्णय घ्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.