For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News | सांगलीत राजकीय वक्तव्यावरून आंदोलनाचा भडका; स्वाभिमानीचा क्षीरसागरांना थेट इशारा

02:56 PM Sep 02, 2026 IST | NEETA POTDAR
sangli news   सांगलीत राजकीय वक्तव्यावरून आंदोलनाचा भडका  स्वाभिमानीचा क्षीरसागरांना थेट इशारा
Advertisement

सांगली : माजी खासदार तथास्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याविरोधात आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सांगली-कर्नाळ रस्त्यावरील राजपूत गार्डन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले.

Advertisement

यावेळी आमदार क्षीरसागर यांचा प्रतीकात्मक पुतळा झाडाला टांगून दहन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला. क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याचा आरोप संघटनेने केला. राजू शेट्टी यांना 'राक्षस' संबोधून त्यांना उलटे टांगण्यात येईल, अशा आशयाचे वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींनी

राजकीय मतभेद असले तरी अशा प्रकारची भाषा वापरणे योग्य नसल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. शेट्टी यांनी अनेक वर्षांपासून शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला आहे. अशा नेतृत्वाबाबत अपमानास्पद भाषा वापरणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सहन करणार नाहीत, असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांनी दिला.

Advertisement

आ क्षीरसागर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत खुलासा करून राजू शेट्टी यांची जाहीर माफी मागावी, अशीमागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. माफी न मागितल्यास आगामी काळात यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. यावेळी संजय बेले, विश्वास कोळी, मनोहर पाटील, अजित लांडे, दीपक फराटे, चंद्रकांत अडसूळ, मयूर पाटील, नटराज पाटील, शरद पाटील, श्रीधर पाटील, अवधूत पाटील, संतोष ढोले, विनोद बेले यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.