For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लक्ष्मी हेब्बाळकरांवरील अन्यायाने संतप्त समर्थकांची निदर्शने

06:54 AM Aug 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
लक्ष्मी हेब्बाळकरांवरील अन्यायाने संतप्त समर्थकांची निदर्शने
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

बेळगाव

माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद मिळाले नाही म्हणून संतप्त समर्थकांनी सोमवारी राणी चन्नम्मा चौक परिसरात निदर्शने केली. तत्पूर्वी हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळही धरणे धरून आपल्या मनातील असंतोष व्यक्त केला.

Advertisement

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सिद्धरामय्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री म्हणून उत्तमरीत्या पदभार सांभाळला आहे. याबरोबरच पक्षसंघटनेच्या कामातही त्यांचे योगदान आहे. अशा परिस्थितीत त्यांना मंत्रिपद देण्याऐवजी का वगळण्यात आले? असा प्रश्न संतप्त चाहत्यांनी उपस्थित केला.

मंत्रिमंडळ विस्तारावेळी त्यांचे नाव वगळून त्यांच्यावर अन्यायच केला आहे, असा आरोपही कार्यकर्त्यांनी केला असून हा अन्याय दूर करण्यासाठी हायकमांडने लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रिपद द्यावे, अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राणी चन्नम्मा चौक परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Advertisement
Tags :

.