For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केंद्र-राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने

11:03 AM Nov 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
केंद्र राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने
Advertisement

विविध मागण्यांसाठी चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून सरकारचा निषेध 

Advertisement

बेळगाव : शेतकऱ्यांना एमएसटी लागू करण्याबरोबर सरसकट कर्जमाफी करावी, विजेचे आणि एपीएमसीमधील खासगीकरण थांबवावे यासह इतर मागण्यांसाठी मंगळवारी विविध संघटनांतर्फे चन्नम्मा चौकात मानवी साखळी करून केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र आणि राज्य सरकारला निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान मागणी न झाल्यास विविध संघटनांमार्फत प्रत्येक तालुका आणि जिल्हास्तरावर आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

26 नोव्हेंबर 2020 मध्ये बिहार, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यातील शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर एमएसटी (मिनिमम सपोर्ट प्राईज) लागू करावी, यासाठी आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला चार वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप केंद्र सरकारचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. उलट शेतकऱ्यांवर अन्याय वाढला आहे. शिवाय शेतकऱ्यांची कर्जमुक्ती देखील झालेली नाही. यासाठी विविध संघटनांतर्फे निषेध नोंदविण्यात आला.

Advertisement

केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी, महिला आणि दलितांवर अन्याय केला आहे. स्वामीनाथन अहवालाकडेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे दलितांवर अन्याय होत आहे. शेतकरी, दलितांच्या मागण्यांचा केंद्र आणि राज्य सरकारने विचार करावा. अन्यथा तीव्र आंदोलन हाती घेतली जाणार आहे, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे. या आंदोलनामध्ये रयत संघटना, स्वाभीमानी शेतकरी संघटना, कामगार संघटना, मानव बंधुत्व संघटना यासह इतर विविध संघटनांचे पदाधिकारी व शिवलीला मिसाळे, जी. व्ही. कुलकर्णी, मंदा नेवगी यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.