For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उद्या आंदोलन

10:56 AM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उद्या आंदोलन
Advertisement

अपुऱ्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय : अभाविपची पत्रकार परिषदेत माहिती 

Advertisement

बेळगाव : शक्ती योजना सुरू केल्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या कमालीची वाढली. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होत आहे. तुडुंब भरलेल्या बसमध्ये शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जागाच नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. ही समस्या त्वरित सोडवावी, यासाठी शुक्रवार दि. 12 रोजी जिल्हा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी ये-जा करतात. शक्ती योजनेमुळे महिला प्रवाशांची संख्या वाढली असली तरी बसफेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना लोंबकळत प्रवास करावा लागत आहे. तसेच बसपास देण्यासही विलंब झाल्याने गरीब विद्यार्थी आर्थिक संकटात सापडत आहेत. यामुळे परिवहन मंडळाशी चर्चा करून बसपास तसेच अपुऱ्या बससेवेबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी केली.

Advertisement

बहुतांश विद्याथी सुविधापासून अद्याप वंचितच

शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दीड महिना होत आला तरी अद्याप वसतीगृह निवड प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही. यामुळे अनुसूचित जाती-जमाती व गरीब विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. राज्य सरकारकडून दिली जाणारी शिष्यवृत्तीही स्थगित ठेवण्यात आल्या आहेत. याचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांना सुविधा देण्यासाठी शुक्रवारी जिल्हा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी अभाविपचे शहर सचिव रोहित अलकुंटे, रोहित हुमणाबादीमठ, प्रशांत गळ्ळीकवीमठ, समीर हिरेमठ यासह इतर उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.