आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी वीज अधिकाऱ्यांना तीन तास धरले धारेवर
मागण्या मान्य केल्याच्या लेखी पत्रानंतर आंदोलन स्थगित
आचरा प्रतिनिधी
ऐन दिवाळीपासून आचरा सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या भागात सातत्याने विजेचा लपंडाव चालू असल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीज वितरणला धडक देण्याचा इशारा दिला होता. गुरुवारी सकाळी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आचरा वीज वितरण कार्यालयात धडक देत उपस्थित उपकार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत 3 तास कार्यालयात रोखून धरले होते. अखेर उपकार्यकारी अभियंता राहुल लिंबकर, यांनी ग्रामस्थांच्या असलेल्या मागण्या मान्य करून येत्या 10 दिवसात कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले असता ग्रामस्थांनी येत्या 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा पूर्वसुचना न देता उग्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले. आचरा सबस्टेशन मधून सातत्याने वीज खंडीत होत असल्यामुळे आचरा गावासह तोंडवळी, वायंगणी, चिंदर त्रिंबक भागातील ग्रामस्थ व व्यापाऱ्यांना फटका बसला होता वीज वितरणला जाब विचारण्यासाठी आचरा पंचक्रोशी गावातील ग्रामस्थ सरपंच जेराॅन फर्नांडिस, महेश राणे,आचरा उपसरपंच संतोष मिराशी, माजी सरपंच राजन गावकर, मंगेश टेमकर, तोंडावळी माजी सरपंच संजय केळूसकर, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, उपाध्यक्ष परेश सावंत, जयप्रकाश परुळेकर, अभिजित सावंत, डॉ प्रमोद कोळंबकर, ग्रामपंचायत सदस्य मुजफ्फर मुजावर, पंकज आचरेकर, महेंद्र घाडीं यांसह सिद्धार्थ कोळगे, गुरु कांबळी, विजय कदम, नाना पाटील, मंदार सरजोशी, उदय घाडी, समीर बावकर, जयंत पांगे, विदयानंद परब, बाळा घाडी, सुनील दुखंडे, शिंबू नायर, निखिल ढेकणे यांसह अन्य ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलन स्थळी उपस्थित झाले होते.