छ. शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा इन्सुलीत निषेध
सार्वजनिक बांधकामच्या विरोधात घोषणाबाजी
मयुर चराटकर
बांदा
मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध इन्सुली गावातील शिवप्रेमींनी केला. महामार्गावरील इन्सुली खांमदेव नाका येथे मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी संबंधित बांधकाम विभागाच्या विरोधात जोरदार घोषणाही देण्यात आल्या. तर घडलेली घटना निषेधार्ह असून दोषींवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी सरपंच तात्या वेंगुर्लेकर यांनी केली. यावेळी सरपंच तात्या वेंगुर्लेकर, मराठा समाज अध्यक्ष नितीन राऊळ, तंटामुक्त समिती अध्यक्ष सदा कोलगावकर, महेंद्र सावंत, नलू मोरजकर, संजय पालव, अजय सावंत, राजन परब, सुहास ठाकूर, श्याम केरकर, तेजस पालव, सिद्धेश गावडे, शुभम मुळीक, दया चौकेकर, रुपेश पालव, सुमन परब, आपा गावडे, द्विजे फर्नांडिस, गौरेश घोगळें, पिंगुळकर, गोट्या परब, गजेंद्र कोठावळे, संतोष मेस्त्री, सदा राणे आदीसह मोठया प्रमाणात शिवप्रेमी उपस्थित होते.