सावंतवाडीत भाजपतर्फे महाविकास आघाडीच्या विरोधात निषेध आंदोलन
सावंतवाडी । प्रतिनिधी
राजकोट मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळला. शिवसेना ,भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार याला जबाबदार असल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने राज्यात महायुतीच्या विरोधात रविवारी जोडे मारो आंदोलन आयोजित केले . याला प्रतिउत्तर म्हणून महायुतीने महाविकास आघाडीच्या विरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलन केले सावंतवाडीत कॉलेज रोडवरील भाजपच्या कार्यालयासमोर भाजपने महाविकास आघाडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, रवी मडगावकर, जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्वेता कोरगावकर ,मनोज नाईक ,प्रवीण देसाई ,मधु देसाई ,अजय सावंत ,अजय गोंदावळे, परिक्षीत मांजरेकर ,प्रमोद गावडे ,अमित परब मोहिनी मडगावकर, दीनानाथ नाईक यांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. मालवण राजकोट येथील घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली आहे. तरी महाविकास आघाडी तर्फे निवडणुकीच्या तोंडावर राजकारणासाठी आंदोलन करण्यात येत आहे. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आल्याचे संजू परब यांनी सांगितले. यावेळी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार ,नाना पटोले ,उद्धव ठाकरे ,संजय राऊत ,आदित्य ठाकरे ,अमोल कोल्हे ,विजय वडेट्टीवार, प्रियंका चतुर्वेदी, यांना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्याबाबत केलेल्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर भाजप तर्फे सवाल करण्यात आले आहेत.