देशमुख,सूर्यवंशी हत्याप्रकरणी 23 रोजी सांगलीत आक्रोश मोर्चा
सांगली :
मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख व परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या निर्घृण खुनाच्या निषेधार्थ मराठा समाजाची व्यापक बैठक मराठा समाज भवन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सांगलीमध्ये 23 जानेवारीस आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या आक्रोश मोर्चास कै संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, कन्या वैभवी देशमुख व त्यांचे कुटुंबीय तसेच खासदार बजरंग सोनावणे, आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, उपस्थित राहून मोर्चास संबोधित करणार आहेत.
या आक्रोश मोर्च्या च्या नियोजनासाठी दि. 17 जानेवारी रोजी सकाळी 11 वा मराठा समाज येथे सर्व बहुजन समाजातील बांधवानी उपस्तिथ राहावे असे आवाहन मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे. या बैठकीला विलास देसाई, संजय पाटील, अभिजित पाटील, दिग्विजय पाटील, तानाजी चव्हाण, विजय धुमाळ, तानाजी भोसले, दादासाहेब पाटील मच्छिंद्र बाबर, संभाजी पाटील, विकास मोहिते, प्रदीप कर्वेकर, ऍड. उत्तमराव निकम, अशोकराव पाटील, अरुण गवंडी, स्वप्नील देशमुख, अशोक शिंदे, धनंजय हलकर, ऋषिकेश खराडे, संतोष भोसले तसेच मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाड्यातील आक्रोश मोर्चाचे हे लोन हळूहळू पश्चिम महाराष्ट्रात येत असून यापूर्वी पुणे येथे मोठा मोर्चा काढण्यात आला आहे. त्यानंतर सांगलीमध्ये होणाऱ्या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विविध समाज घटकांना सामावून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क सुरू असल्याचे आयोजकांनी सांगितले.