बांग्लादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी मोर्चा
06:25 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / कोलकाता
Advertisement
‘बांगसेना’ नावाच्या हिंदू संघटनेचे शेकडो समर्थक आणि साधूंनी नुकताच कोलकाता येथील बांगलादेश उप उच्चायुक्तालयाच्या दिशेने एक मोठा मोर्चा काढला. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंना संरक्षण मिळावे, त्यांच्यावरील अत्याचार थांबवावेत आणि तुरुंगात असलेल्या भिक्षू चिन्मय कृष्णदास यांची सुटका करावी अशा आंदोलकांच्या मागण्या होत्या. हा मोर्चा सियालदाह रेल्वे स्टेशनवरून सुरू झाला. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव, पोलिसांनी त्यांना पार्क सर्कस परिसरातील उच्चायुक्तालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे 100 मीटर अंतरावर अडवले. या महिन्यात बांगलादेश उप उच्चायुक्तालयाबाहेर झालेले हे दुसरे आंदोलन होते.
Advertisement
Advertisement
