For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेशातील हिंदू धर्मीय तरुणाच्या हत्येप्रकरणी मालवणात निषेध

05:55 PM Dec 24, 2025 IST | अनुजा कुडतरकर
बांगलादेशातील हिंदू धर्मीय तरुणाच्या हत्येप्रकरणी मालवणात निषेध
Advertisement

मालवण (प्रतिनिधी)

Advertisement

बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी आणि तेथे हिंदूंवर होत असलेल्या अत्याचार विरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे मालवणात भरड नाका येथे हिंदू बांधव भगिनींनी एकत्र येत बांगलादेश विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. बांगलादेश मुर्दाबाद... भारत माता की जय... वंदे मातरम... घराघरातून करा पुकार... हिंदुत्वाचा जयजयकार अशा घोषणा यावेळी देतानाच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत तो जाळण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषद तालुका अध्यक्ष भाऊ सामंत, प्रखंड सहमंत्री हरेश पडते, बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक श्रीराज बादेकर, प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, स्वप्निल गाडी पार्थ डिचवलकर, सुरेश मानवर, शिवशंभू विचार मंचचे जिल्हा संयोजक भूषण साटम, नगरसेवक मंदार केणी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, सनातन संस्थेचे राजन सकपाळ, दीनानाथ गावडे, महेंद्र पाताडे, अरविंद मयेकर, पंकज नेरकर, श्रीराम परब, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे श्रीधर काळे, स्वराज्य संघटनेच्या सौ. शिल्पा खोत, माजी नगरसेविका पूजा सरकारे, राणी कुडाळकर, तनु भगत, अंजना सामंत, महिमा मयेकर, अमिता न्हिवेकर, राजेश वळंजू, मंदार सरजोशी, अजित आचरेकर, अशोक चव्हाण, बाबी चव्हाण, राजू आंबेरकर, हरी चव्हाण, मिलिंद झाड, नंदू गवंडी, निलेश गवंडी, शरद मोरे, ओम अटक, अमन गोडवले, आनंद आचरेकर आदी व इतर उपस्थित होते.बांगलादेशमध्ये हिंदू धर्मीय सुरक्षित नसून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, याविरोधात भारतातील हिंदूंनी एकवटून आवाज उठवीला पाहिजे, हिंदूंनी आता जागृत झाले पाहिजे, असे यावेळी भाऊ सामंत म्हणाले. यावेळी भूषण साटम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. श्री. साटम म्हणाले, धर्मांध शक्तिकडून आज हिंदू धार्मियांवर अत्याचार होत आहेत. अत्याचारच्या घटना आजच घडत नसून ७ व्या शतकापासून धर्मांध शक्तींनी हिंदू धार्मियांवर आक्रमणे होत आहेत. बांगलादेशला वेगळा देश बनविण्यासाठी भारताच्याच सैनिकांनी, हिंदू बांधवांनी आपले रक्त सांडले होते. मात्र याच बांगलादेशात आज अल्पसंख्यांक असणाऱ्या हिंदू धार्मियांवर अत्याचार होत आहेत हि हिंदू धार्मियांसाठी खेदाची आणि आत्मसन्मानाला आव्हान देणारी गोष्ट आहे. बांगलादेश मधील दीप चंद्रदास या हिंदू तरुणाची अमानुषपणे हत्या करण्यात आली. हे अत्याचार हिंदू अखंडत्वावर आणि सार्वभौमत्वावार घाला आहे. या जिहादी धर्मांध शक्तीकडून संपूर्ण भारतात आक्रमणाचा डाव आहे. हा डाव आपण आताच ओळखला पाहिजे, संपूर्ण भारतात अशाप्रकारची निदर्शने झाली पाहिजेत, बंगलादेशातील घटनेची भारत सरकारने दखल घेऊन यामध्ये राजकीय व प्रसंगी लष्करी हस्तक्षेप करावा, असेही भूषण साटम म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.