For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Hatkanangale | हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयात दप्तरच मिळेना! दलित महासंघाचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

03:12 PM May 25, 2026 IST | NEETA POTDAR
hatkanangale   हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयात दप्तरच मिळेना  दलित महासंघाचे कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
Advertisement

                     हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयाचा भोंगळ कारभार पुन्हा चर्चेत

Advertisement

हातकणंगले : येथील तालुका भूमीअभिलेख कार्यालयामध्ये सव्या महिन्यांपूर्वी नक्कल मागणीचा अर्ज करूनही टाळाटाळ करून अर्जदारास नाहक त्रास देत असल्याच्या निषेधार्थ कार्यालयासमोरच दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी ठिय्या मारुन आंदोलन केले. या आंदोलनामुळे कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबावे लागले. अखेर अधिकाऱ्यांनी कामकाजात सुधारणा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

हातकणंगले भूमी अभिलेख कार्यालयाचा कारभार अनेक कारणाने कायमच वादग्रस्त ठरला आहे. त्यात आता एका अर्जदाराने सव्या महिन्यांपूर्वी नक्कल मागणीचा अर्ज संबंधित कार्यालयाकडे केला होता. त्यांच्याकडून ऑनलाइन चलनही भरून घेतले. मात्र, सायंकाळी संबंधीत गट नंबरचे दफ्तरच सापडत नसल्याचे संबंधीत कर्मचाऱ्यांने सांगून उडवाउडवीची उत्तरे देत अखेरपर्यंतत्यांना नकला दिल्या नाहीत. त्यामुळे दफ्तर गेले कोठे, असा सवाल अर्जदाराने केला. तसेच कार्यालयाच्या कारभाराचा पाढाच वाचला. यावर दलित महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष मार्तंड वाघमारे यांनी सायंकाळी कार्यालयाच्या दारात ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

Advertisement

आश्वासनानंतर आंदोलन मागे
आंदोलनकर्ते मार्तंड वाघमारे, प्रा. सुकुमार कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास कांबळे यांनी या कार्यालयातील भोंगळ कारभाराचा पाढाच वरिष्ठांसमोर मांडला. यावेळी वरिष्ठांनी कार्यालयाच्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले, त्यामुळे रात्री उशिरा आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.