कोल्हापूरात छगन भुजबळ यांच्या पुतळ्याचे दहन! पुतळ्याला जोडे मारून केला भुजबळांचा निषेध
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाकडून त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे. आज कोल्हापूरातही सकल मराठा समाजाकडून छगन भुजबळ यांचा निषेध करण्यात येऊन त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारण्यात आले. तसेच छगन भुजबळ यांच्या नावाने शंखध्वनी करून त्यांचा पुतळा जाळण्याचा प्रकारही करण्यात आला.
राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाज जोरदार आंदोलन करत आहे. मराठा समाजाला ओबीसींच्या 50 टक्केंच्या कोट्य़ातून आरक्षण द्यावी अशी आग्रही मागणी केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्याबद्दल आमरण उपोषणही केलं आहे. सरकारने त्यांच्याकडे दोन महीन्यांची मुदत मागून आरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे.
सरकारच्या या निर्णयाने ओबीसी नेते मात्र दुखावले आहेत. सरकार मराठा समाजाला जर ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देणार असेल तर ओबीसी समुदायाचा त्याला विरोध असेल असे म्हटले आहे. त्यामुळे राज्यभरात छगन भुजबळ यांनी मराठा समाजाचा रोष ओढवून घेतला आहे. तसेच त्यांच्याविरोधात आंदोलनही होत आहेत.
कोल्हापूरात आज सकल मराठा समाजाच्या वतीने छगन भुजबळ यांचा जाहीर निषेध केला गेला. ऐतिहासिका दसरा चौकात आज छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन मारण्यात आले. तत्पुर्वी छगन भुजबळ यांच्या विरोधात घोषणा देण्यात येऊन मराठा आरक्षणाला विरोध केला तर मराठा समाज त्यांना योग्य जागा दाखवेल असे आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आले. तसेच छगन भुजबळ यांच्या नावाने शंखध्वनी करण्यात येऊन शेवटी तो पुतळा जाळण्यात आला.