विनाअनुदानित शाळा शिक्षकांचे बेंगळूरमध्ये आंदोलन
06:37 AM Aug 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव
Advertisement
राज्यातील विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे या मागणीसाठी सोमवारी विनाअनुदानित शाळा शिक्षक संघटनेच्यावतीने बेंगळूरच्या फ्रीडम पार्क येथे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बेळगावमधील विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले हेते.
1995 नंतरच्या शाळांना अद्याप अनुदान मिळालेले नाही. यामुळे शाळांवर काम करणारे शिक्षक पगाराविना काम करीत आहेत. अनेक पदे रिक्त असूनही ती भरण्यासाठी राज्य सरकारची चालढकल सुरु असून ती तातडीने भरली जावीत यासह इतर मागण्यांसाठी राज्यभरातील शिक्षक एकवटले होते.
Advertisement
बेळगाव जिल्ह्यातील विनाअनुदानित शिक्षक पी. पी. बेळगावकर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभागी झाले होते. शाळांना अनुदान मिळाल्यास विद्यार्थ्यांचाही शैक्षणिक विकास होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे तातडीने अनुदान मंजूर करावे, अशी मागणी करण्यात आली.
Advertisement