Crime News | करकंब पोलीस ठाण्यासमोर मृतदेह ठेवून आंदोलन
11:24 AM May 26, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
Advertisement
कुरोली येथील तरुणीवर दीड महिन्यापूर्वी अत्याचार
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथील एका तरुणीवर दीड महिन्यापूर्वी अत्याचार करण्यात आला होता. यामुळे या तरुणीने ११ एप्रिल रोजी ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त नातेवाईकांनी या प्रकरणातील आरोपीस अटक करावी, या मागणीसाठी करकंब पोलीस ठाण्यासमोर तरुणीचा मृतदेह ठेवून आंदोलन केले.
या तरुणाने तरुणीवर विविध ठिकाणी नेऊन एका तरुणाने अत्याचार केले होते. यामुळे तरुणी घाबरून गेली होती.
याप्रकरणी करकंब पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तिने यानंतर ॲसिड पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र नातेवाईकांनी वेळीच तिला उपचारासाठी पुणे येथे, नंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
गेली अनेक दिवस तिच्यावर उपचार सुरू होते; अखेर रविवारी उपचार सुरू असताना सोलापूर येथे तिचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणातील तरुणास अटक केली नसल्यामुळे नातेवाईकांनी करकंब पोलीस ठाण्यासमोर तरुणीचा मृतदेह ठेवून आंदोलन केले.
जोपर्यंत तरुणास अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करण्यात येणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे गावात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची गंभीर दखल वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घेतली असून नातेवाईकांना लवकरच आरोपीस अटक करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
Advertisement