आकाशकंदील बंद ठेवून निषेध
06:44 AM Nov 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
म. ए. समितीच्या आवाहनाला प्रतिसाद
Advertisement
प्रतिनिधी/ बेळगाव
सीमावासियांवर झालेल्या अन्यायाची माहिती सर्वांना व्हावी, या उद्देशाने म. ए. समितीने आकाशकंदील दिवे अथवा विद्युत रोषणाई करू नये, असे आवाहन केले होते. या आवाहनाला बेळगाव शहरासह तालुक्यातील मराठी भाषिकांनी प्रतिसाद दिला. आकाशकंदील व दिवे न लावता शुक्रवारी मौन पाळण्यात आले.
Advertisement
म. ए. समितीच्या घटक समित्यांच्या बैठकीत अनेक कार्यकर्त्यांनी आकाशकंदील व दिवे लावू नये, असे आवाहन केले होते. त्यानंतर म. ए. समितीनेही सीमावासियांना आवाहन करत विद्युत रोषणाई करू नये, असे स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आपल्या घरावरील विद्युत रोषणाई बंद ठेवली. तसेच आकाशकंदील व दिवे पेटविले नाहीत.
Advertisement