‘ब्लॅक पँथर’तर्फे जि.प.समोर धरणे आंदोलन
कोल्हापूर प्रतिनिधी
सुंडी (ता. चंदगड) येथील भाई दाजीबा देसाई माध्यमिक शाळेत बिंदू नामावली डावलून अनुसुचित जातीच्या शिक्षकाला मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवले आहे. असा आरोप करत ब्लॅक पँथर पक्षातर्फे गुऊवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
सुंडी (ता. चंदगड) येथील भाई दाजीबा देसाई माध्यमिक शाळेत बिंदू नामावली डावलून अनुसूचित जातीच्या शिक्षकाला मुख्याध्यापक पदापासून वंचित ठेवण्यात आले आहेत. तसेच कोकरे (ता. चंदगड) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबतही तक्रार करूनही कारवाई होत नाही, याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या संबंधित दोन्ही विभागांनी योग्य ती चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई, विजय घाटगे, नामदेव कांबळे, पंडित कांबळे, विष्णू कांबळे, प्रकाश कांबळे, गुंडु कांबळे, दीपक कांबळे आदी सहभागी झाले होते.