For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिमोग्यातील कुवेंपू विद्यापीठात कुलगुरुंविरुद्ध आंदोलन

11:52 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिमोग्यातील कुवेंपू विद्यापीठात कुलगुरुंविरुद्ध आंदोलन
Advertisement

बेंगळूर : शिमोग्यातील कुवेंपू विद्यापीठात बुधवारी विद्यार्थ्यांनी कुलगुरुंविरुद्ध तीव्र आंदोलन छेडले. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण झाला. एनएसयुआयच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनावेळी काही जणांनी कुलगुरुंच्या कार्यालयावरील नामफलकाला काळे फासून असंतोष व्यक्त केला.

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून शिष्यवृत्तीचे योग्य पद्धतीने वितरण झालेले नाही. विद्यार्थी वसतीगृहात मूलभूत सुविधांचा अभाव व निकृष्ट व्यवस्थापन, पहिल्या, तिसऱ्या आणि पाचव्या सेमिस्टरच्या निकालाला विलंब या कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोष आहे. यासंबंधी विद्यापीठ प्रशासनाकडे अनेकवेळा निवेदन देऊन सुद्धा कोणतीही प्रतिक्रिया आली नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

काही तात्कालिक कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे कुलगुरुंचे लक्ष नाही. मागण्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरुंच्या कार्यालयाबाहेरील मोकळ्या जागेवर फुलझाडांच्या कुंड्या फोडल्या. परिस्थितीतवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले.

Advertisement

कुलगुरु काय म्हणाले?

या घटनेविषयी प्रतिक्रिया देताना कुवेंपू विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरत अनंतमूर्ती म्हणाले, संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल. आंदोलक जमा झालेल्या ठिकाणी मी तातडीने धाव घेतली. त्यावेळी माझ्याविरोधात घोषणाबाजी करून घेराव घालण्यात आला. धक्काबुक्कीचाही प्रयत्न झाला. आंदोलन करणारे कोण हे अद्याप समजलेले नाही. आंदोलन करणाऱ्यांपैकी चौघे यापूर्वी माझ्याजवळ आले होते, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.