महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मुतगे येथे बिनव्याजी कर्ज वितरण न केल्याच्या निषेधार्थ आंदोलन

11:34 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वार्ताहर /सांबरा

Advertisement

मुतगे येथे प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाने अद्याप शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्जाचे वितरण न केल्याच्या निषेधार्थ सभासद शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन हाती घेतले आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे गावातील वातावरण तापले आहे.दरवर्षी शेतकऱ्यांना कृषी पत्तीन संघामार्फत बिनव्याजी कर्जाचे वितरण करण्यात येते. मात्र यंदा सहा महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी नोव्हेंबर 2023 मध्येही सहा दिवस आंदोलन छेडून कृषी पत्तीन संघाचे बारा वर्षांचे ऑडिट करण्याची मागणी केली होती व त्यामध्ये जे कोणी दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली होती.

Advertisement

मात्र यामध्ये जे कोणी दोषी आढळतात त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. अद्याप याबाबत कोणत्याच हालचाली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. त्यामुळे वातावरण तापले आहे. शेतकूयांनी प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या कार्यालयासमोर दिवसभर बसून ठिय्या आंदोलन छेडले. या आंदोलनात सचिन पाटील, जोतिबा केदार, आप्पाण्णा बस्तवाड, सयाजी पाटील, यल्लाप्पा कणबरकर, भावकांना पाटील, सिद्धाप्पा पाटील, जयसिंग पाटील, फोंडू पाटील, शंकर पाटीलसह अनेक शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article