For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धमकी देणाऱ्यांपासून आम्हाला संरक्षण द्या

10:53 AM Jul 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
धमकी देणाऱ्यांपासून आम्हाला संरक्षण द्या
Advertisement

महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांचे मनपा आयुक्तांना निवेदन

Advertisement

बेळगाव : महात्मा फुले मार्केटमधील गाळेधारकांना इनामदार कुटुंबीय व इतर काही जण धमकी देत आहेत. तुम्ही आमच्याशी करार करा, या दुकान गाळ्यांचे भाडे आम्हालाच द्या, असे सांगत त्या परिसरात दहशत माजवत आहेत. तेव्हा तातडीने त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी महात्मा फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी महानगरपालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मास्टर प्लॅनमध्ये अनेकांची दुकाने तसेच जागा गेली होती. त्या विस्थापितांना महानगरपालिकेने महात्मा फुले मार्केटमध्ये गाळे बांधून घेण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली होती.

आम्ही 25 व्यावसायिकांनी स्वत: खर्च करून गाळे बांधून घेतले. त्याठिकाणी गेली अनेक वर्षे आम्ही सर्वजण व्यवसाय करत आहे. असे असताना अचानकपणे येऊन दमदाटी केली केली जात आहे. खादर पाशा इनामदार, सय्यद कवानन इनामदार, सय्यद खाजापाशा इनामदार, सय्यद शालिपाशा इनामदार, सुनील काकतकर, अजिम पाशा इनामदार, प्रकाश गोवेकर हे आम्हाला धमकी देत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Advertisement

गाळेधारकांना तुमचे आधारकार्ड द्या, आमच्याशी करार करा, भाडेही आम्हाला द्या असे ते सांगत आहेत. या जागेबाबत न्यायालयात वाद होता. मात्र त्याठिकाणी महानगरपालिकेच्यावतीनेच निकाल लागला आहे. असे असताना दमदाटी करत आहेत. तेव्हा महानगरपालिकेने आम्हाला संरक्षण द्यावे, असे या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सुशील बेळगुंदकर, गिरीश पाटणकर, एस. बी. मलकाचे, वामन देसूरकर, एम. बी. पुणेद, सुनील बाळेकुंद्री, राहुल बाळेकुंद्री, अब्दुलगणी मुजावर यांच्यासह इतर गाळेधारकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement
Tags :

.