Solapur News | सांगोल्यात हॉटेलमध्ये सुरू होता वेश्या व्यवसाय; निर्भया पथकाचा मध्यरात्री छापा
सांगोला -कमलापूर येथील सांगोला ते मिरज रोडवर असलेल्या 'आकाश हॉटेल अँड लॉजिंग' येथे चालण्प्रया वेश्या व्यवसायाचा पंढरपूर विभागीय निर्भया पथक आणि पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास संयुक्तरित्या छापा टाकून पर्दाफाश केला. या कारवाईत हॉटेल मालक, चालक, एक महिला आणि ७ग्राहकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश हॉटेल अँड लॉजिंग' येथेमहिलांना आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पो.नि. राहुल देशपांडे यांना मिळाली होती. त्या आधारे पो.नि. राहुल देशपांडे, पंढरपूर उपविभागाचे निर्भया पथक, पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया यादव, पोहनि. गुरव, पोलीस नाईक प्रमोद गवळी, पो. कॉ. आवटे, सावंत, कुचेकर, टिंगरे, काझी आणि वाघमारे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटेच्या सुमारास सापळा रचला. पोलिसांनी योगेश महाडिक यांना बनावट ग्राहक म्हणून लॉजवर पाठवले आणि पथक काही अंतरावर दबा धरून बसले. महाडिक यांनी इशारा करताच पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत प्रवेश करून बनावट ग्राहक आणि पीडित महिलेला ताब्यात घेतले.
कारवाई दरम्यान पोलिसांनी चालक चंद्रकांत भीमराव मोटे (वय ४०, रा. तनाळी, ता. पंढरपूर) याच्याकडून ग्राहकाने दिलेले पैसे जप्त केले. पीडित महिलेकडे चौकशीकेली असता, तिने या हॉटेलचा मालक अविनाश विष्णू येडगे (रा. तनाळी, ता. पंढरपूर) असल्याचे सांगितले. मालक आणि चालकाने पीडित महिलेला पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी खोली उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी शुभम उत्तम ढोबळे (रा.कमलापूर येथील घटना नाझरा, ता. सांगोला), आसिफ मुलाणी (रा. आलराईन नगर), आशिष बनसोडे (रा. भीमनगर, सांगोला), प्रतीक बनसोडे (रा. भीमनगर, ता. सांगोला), अब्दुल्ला खाटीक (रा. आनंदनगर, सांगोला), निलेश कांबळे (रा. तनाळी, ता. पंढरपूर) अमोल ढोबळे (रा. नाझरा) यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सउनि.) स्नेहलन चव्हाण यांनी चंद्रकांत मोटे, हॉटेल मालक अविनाश येडगे आणि उपस्थित ग्राहकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.