For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

चांद्रयान-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत

06:36 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
चांद्रयान 3 चे प्रोपल्शन मॉड्यूल पृथ्वीच्या कक्षेत

इस्रोकडून नवा यशस्वी प्रयोग

Advertisement

वृत्तसंस्था/ बेंगळूर

चांद्रयान-3 कडून चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग झाल्यावर इस्रोने पुन्हा एकदा सर्वांना चकित केले आहे. यावेळी इस्रोने चंद्राला प्रदक्षिणा घालत असलेल्या प्रोपल्शन मॉड्यूलला पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत आणण्यात यश मिळविले आहे. इस्रोने हा प्रयोग करून स्वत:चे यान परत आणण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.

Advertisement

चांद्रयान-3 मोहीम : सीएच-3 चे प्रोपल्शन मॉड्यूल एक यशस्वी प्रदक्षिणा घालते. एका अन्य अनोख्या प्रयोगात प्रोपल्शन मॉड्यूलला चंद्राच्या कक्षेतून पृथ्वीच्या कक्षेत आणले गेले असल्याचे इस्रोने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.

Advertisement

प्रोपल्शन मॉड्यूलमध्ये 100 किलो इंधन शिल्लक होते, अशा स्थितीत भविष्यातील मून सॅम्पल रिटर्न मिशन आणि अन्य मोहिमांसाठी अतिरिक्त माहिती मिळावी म्हणून या इंधनाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच प्रोपल्शन मॉड्यूलला पृथ्वीच्या कक्षेत पुन्हा स्थापित करण्याचे निश्चित करण्यात आल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले.

प्रोपल्शन मॉड्यूलमधील इंधन विचारात घेत मोहिमेचे नियोजन करण्यात आले. प्रोपल्शन मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागाला धडकू नये हे देखील विचारात घेण्यात आले. तसेच पृथ्वीच्या जियोस्टेशनरी इक्वेटोरियल ऑर्बिट (जीईओ) बेल्ट आणि त्याखालील कक्षेत ते जाऊ नये हे देखील पाहिले गेले. पृथ्वीपासून 36 हजार किलोमीटर अंतरावरील कक्षेला जीईओ बेल्ट म्हटले जाते.

भविष्यातील मोहिमांसाठी प्रयोग आवश्यक

या प्रयोगामुळे इस्रोयला भविष्यातील मोहिमांसाठी चार प्रकारे मदत मिळणार आहे. चंद्रावरून पृथ्वीच्या दिशेने एखादे यान परत आणण्याचे नियोजन आणि त्याची अंमलबजावणी करण्यास या प्रयोगामुळे मदत होणार आहे. तसेच यान परत आणण्यासाठी योग्य सॉफ्टवेअर करण्यास सहाय्य होईल. कुठल्याही ग्रहाच्या चहुबाजूला असलेल्या गुरुत्वाकर्षणाचा लाभ घेत कक्षा बदलणेही शक्य होणार आहे.

चांद्रयान-3 मोहिमेचा प्राथमिक उद्देश चंद्राच्या दक्षिण ध्रूवीय क्षेत्रानजीक सॉफ्ट लँडिंग करून विक्रम आणि प्रज्ञानवरील उपकरणांचा वापर करून प्रयोग करणे होता. अंतराळयान 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. विक्रम लँडरने 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर ऐतिहासिक लँडिंग केले होते आणि यानंतर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आला होता. चांद्रयान-3 मोहिमेच्या उद्दिष्टांची पूर्ण प्राप्ती झाली असल्याचे इस्रोकडून म्हटले गेले आहे.

Advertisement
Tags :
×

.