For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

1.17 कोटीची मालमत्ता ईडीच्या छाप्यात जप्त

12:51 PM Feb 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
1 17 कोटीची मालमत्ता ईडीच्या छाप्यात जप्त
Advertisement

पणजी : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पणजी विभागीय कार्यालयाने मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत बँक फसवणूक प्रकरणात अंदाजे 1 कोटी 17 लाख  ऊपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विरोधी विभागाने 7 ऑक्टोबर 2022 रोजी हेमंत रायकर आणि गुंडू केळवेकर यांच्याविऊद्ध नोंद केलेल्या तक्रारीवरून ही चौकशी ईडीने सुऊ केली आहे. बनावट दागिन्यांसह सोन्याचे दागिने तारण ठेऊन कर्ज मिळवून बँकेच्या वेर्णा, फातोर्डा आणि मडगाव शाखांना फसवण्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

Advertisement

हेमंत रायकर हा सोन्याचे मूल्यांकन करणारा (गोल्ड व्हॅल्यूअर) असून त्याने बनावट वस्तू खऱ्या असल्याचे प्रमाणित केले होते. त्यामुळे केळवेकर याला 20 व्यक्तींच्या नावावर 32 कर्जे मिळाली होती. एकूण 2 कोटी 81 लाख ऊपयांचे गुह्यातून मिळालेले उत्पन्न, सोने आणि मालमत्ता खरेदी करण्यासाठी केळवेकर यांच्या वैयक्तिक खात्यात वळवण्यात आले हेते. 5 सप्टेंबर 2025 रोजी त्यांच्या जागेवर टाकलेल्या छाप्यांमध्ये गुन्हेगारी पुरावे मिळाले. गोवा ईडीने आता शुक्रवारी तात्पुरत्या स्वरूपात जंगम व स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. या प्रकरणात 1 कोटी 17 लाख ऊपयांच्या मालमत्तेचा शोध घेण्यात आला आहे. संशयितांची ओळखपत्रे व व्यवसायिक जागेवरून गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.