मनी लाँडरिंगकप्रकरणी गोव्यात 11.82 कोटीची मालमत्ता जप्त
इडीची धडक कारवाई, जमीन घोटाळा प्रकरण
पणजी : राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणासंदर्भात मनी लाँडरिंग कायद्याखाली अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) काल शुक्रवारी तिघांविरेधात कारवाई करून त्यांची 11 कोटी 82 लाख ऊपये किमंतीची मालमत्ता जप्त केली आहे. एस्टेव्हन डिसोझा, मोझेस फर्नांडिस आणि समीर कोरगावकर यांच्या त्या मालमत्ता आहेत. संशयितांनी बेकायदेशीरपणे जमीन बळकावण्यासाठी मालमत्तेचा मालक मरण पावलाय, कायदेशीर वारस नाहीत, किंवा तोही मरण पावला आहे, किंवा कायदेशीर वारस भारताबाहेर वास्तव्य करत आहे, अशा मालमत्ता शोधून काढल्या. मालमत्तेच्या मूळ मालकांची फसवणूक करून त्यांच्या नावे विक्री करार किंवा पॉवर ऑफ अॅटर्नी करून या मालमत्ता बळकावल्या, असे तपासात स्पष्ट झाले आहे. याबाबत पर्वरी पोलीस स्थानक आणि आर्थिक गुन्हे विभागाने नोंदवलेल्या तक्रारीवर इडीने काल ही कारवाई केली आहे. जमीन घोटाळा प्रकरणांची संख्या वाढल्यानंतर सरकारने या प्रकरणांचा शोध घेण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्ती केली. गोव्यातील अनेक पोलिसस्थानकात नोंद झालेल्या तक्रारी एसआयटीकडे देण्यात आल्या आहेत. एसआयटी या प्रकरणांचा तपास करीत आहेत. जमीन घोटाळा प्रकरणात अनेकांनी मोठ्याप्रमाणात पैसा केला असून या संगळ्यांची ईडीकडून चौकशी होत आहे.