For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचे 'मिशन भाजी मार्केट'

04:51 PM Feb 28, 2026 IST | अनुजा कुडतरकर
स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांचे  मिशन भाजी मार्केट
Advertisement

संपुर्ण परिसर होणार चकाचक ; व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार तत्परतेने कार्यवाही

Advertisement

मालवण : प्रतिनिधी

स्वच्छ सुंदर मालवण शहर हाच ध्यास आणि हाच श्वास घेऊन मालवण नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य सभापती पुनम चव्हाण या 'ऑन ड्युटी 24 तास' कार्यरत आहेत. आता त्यांनी मिशन भाजी मार्केट यावर लक्ष केंद्रित केले आहे. व्यापाऱ्यांच्या मागणीनुसार या ठिकाणी विशेष स्वच्छता मोहीम घेऊन परिसर चकाचक केला जात आहे.मालवण शहर बाजारपेठ येथे मालवण नगर परिषदेचे भाजी मार्केट आहे. गेली काही वर्ष या ठिकाणी इमारत उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र गेले अनेक महिने इमारतीचे काम रखडले आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात अस्वच्छतेचे व घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. हा परिसर स्वच्छ करावा याबाबत मागणी मालवण व्यापारी यांच्यावतीने करण्यात आली होती. त्याची तात्काळ दखल घेत स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी या ठिकाणी कार्यवाही सुरू केली आहे. यावेळी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, नगरसेविका मेघा सावंत, नगरसेवक मंदार ओरसकर, शेखर गाड यांसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
याठिकाणी वाढलेली झाडी झुडपे व अडगळ जेसीबी मशीन व पालिका कर्मचारी यांच्या मदतीने हटवण्यात आली. मात्र इमारत परिसरात अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य आहे. हा परिसर स्वच्छ करत असताना पालिकेचे स्वच्छता कर्मचारी इथे अडकून पडल्यास शहरातील इतर भागातील कचरा उचल वर परिणाम होऊ नये या दृष्टीने स्वच्छता सभापती पूनम चव्हाण व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी स्वखर्चाने काही कामगारांना बोलावून दोन दिवसात संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याबाबत सांगितले आहे. सोमवार पर्यंत हा संपूर्ण परिसर स्वच्छ केला जाणार आहे. जनतेने आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आमदार निलेश राणे यांना अपेक्षित असलेले जनहिताचे मालवण शहर विकासाच्या दृष्टीने कार्य करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. स्वच्छ सुंदर मालवण या दृष्टीने ज्या ज्या उपायोजना शक्य आहेत जे जे काम करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. असे सभापती पूनम चव्हाण यांनी स्पष्ट केले. फोटो : अमित खोत

Advertisement

Advertisement
Tags :

.