For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्पोर्टींग क्लब बेंगळूरला बढती

12:30 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्पोर्टींग क्लब बेंगळूरला बढती
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

स्पोर्टींग क्लब बेंगळूरने सेकंड डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविल्याने आता या संघाला आय लीग स्पर्धेत बढती मिळाली आहे. सोमवारी येथे झालेल्या सेकंड डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात स्पोर्टींग क्लब बेंगळूरने सुदेव्हा दिल्ली एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला.

गोल्डन टायगर्स या टोपण नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्पोर्टींग क्लब बेंगळूर फुटबॉल संघाला 2024-25 च्या आय लीग फुटबॉल स्पर्धेसाठी बढती मिळाली आहे. स्पोर्टींग क्लब बेंगळूरला सेकंड डिव्हिजन लीग फुटबॉल स्पर्धेतील अद्याप दोन फेऱ्या बाकी असतानाच विजेता म्हणून घोषित करण्यात आले. सोमवारी झालेल्या सामन्यात स्पोर्टींग क्लब बेंगळूर संघातर्फे एकमेव निर्णायक गोल पूर्वार्धात एस. खारपनने नोंदविला. 2022-23 च्या कालावधीत स्पोर्टींग क्लब बेंगळूरने सुपर डिव्हिजन स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदामुळे त्यांना 2023-24 च्या आय लीग 3 स्पर्धेमध्ये खेळता आले. या स्पर्धेत स्पोर्टींग क्लब बेंगळूरने ड गटात सरस गोल सरासरीच्या जोरावर डायमंड हार्बर एफसी संघाला मागे टाकत प्ले ऑफ गटात स्थान मिळविले. आय लीग-3 प्ले ऑफ गटात स्पोर्टींग क्लब बेंगळूरने पहिल्या 3 संघांमध्ये स्थान मिळविले. धेंपो एससी व स्पोर्टींग क्लूब गोवा यांचा यामध्ये समावेश होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.