वैभव नाईकांच्या प्रचाराचा मालवणात शुभारंभ
शिवसैनिकांचे ग्रामदैवतेला मंत्री पदासाठी साकडे
मालवण /प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण सह सातेरी देवीचे आशीर्वाद घेऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. वैभव नाईक हे सलग तिसऱ्यांदा आमदार होणारच आहेत. परंतु, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत आणी वैभव नाईक यांना मंत्रिपदासाठी संधी मिळावी, यासाठी शिवसैनिकांनी ग्रामदेवतेला साकडे घातले.
आमदार वैभव नाईक सलग तिसऱ्यांदा कुडाळ मालवण मतदार संघातून आमदारकी साठी नशीब आजमावत आहेत. शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांचे त्यांच्यासमोर आव्हान असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. आज वैभव नाईक यांनी मालवणचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर, नारायण, सातेरी मंदिरात जाऊन आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी त्यांच्या मंत्री पदासह उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी साकडे घालण्यात आले. यावेळी रामेश्वर नारायण देवस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तर वैभव नाईक यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उद्या कुडाळ मध्ये आपण उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. मागील दहा वर्ष येथील मतदारांनी मला सहकार्य केलं असून या निवडणुकीत देखील जनता माझ्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, नितीन वाळके, मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, उमेश मांजरेकर, रवी तळाशील कर, उमेश चव्हाण, भगवान लुडबे, महेश जावकर, महेंद्र म्हाडगुत, गौरव वेर्लेकर, सन्मेष परब, पूनम चव्हाण, शिल्पा खोत, निनाक्षी मेथर, रुपा कुडाळकर, दीपा शिंदे, निना मुंबरकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिन्स, मेघनाद धुरी यांच्यासह अन्य पदाधिकारी आणी शिवसैनिक उपस्थित होते.