For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वनखात्याच्या नर्सरीत रोप निर्मितीला चालना

10:08 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
वनखात्याच्या नर्सरीत रोप निर्मितीला चालना
Advertisement

मच्छे नर्सरीत लाखो रोपांची लागवड : येत्या पावसाळ्यात मोठे उद्दिष्ट

Advertisement

बेळगाव : येत्या पावसाळ्यात रोप लागवड करण्यासाठी वनखाते सक्रिय झाले आहे. वनखात्याच्या अखत्यारित असलेल्या नर्सरीतून रोपवाटिकेचे काम सुरू झाले आहे. दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर लाखो रुपये रोपांची लागवड केली जाते. या रोप निर्मितीसाठी नर्सरीत कामाला सुरुवात झाली आहे. बेळगाव विभागातील गोल्याळी, नागरगाळी, मच्छे, ओतोळी, लोंढा आदी ठिकाणी वन खात्याच्या नर्सरी आहेत. या ठिकाणी रोप निर्मितीच्या कामाला चालना देण्यात आली आहे. विशेषत: पिंपळ, फणस, आंबा, वड, सागवान यासह वनरोपांची निर्मिती केली जात आहे. निर्माण केलेली रोपे यंदाच्या पावसाळ्यात विविध ठिकाणी लावली जाणार आहेत. वनक्षेत्र वाढविण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी दरवर्षी वनखाते लाखो रोपांची लागवड करते. त्याबरोबर सामाजिक वनीकरण विभागामार्फत खुल्या जागा, प्राथमिक आरोग्य केंद्र, शाळा आणि रस्त्यांच्या दुतर्फा रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे पावसाळ्यात वनखात्याला मोठ्या प्रमाणात रोपांची गरज भासते. यासाठी आतापासूनच नर्सरीतून रोप निर्मिती केली जात आहे. प्लास्टिक पिशव्या आणि रोप वाटिकेत ही रोपे तयार केली जात आहेत. विशेषत: या रोपांसाठी सेंद्रिय खतांचा वापर केला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यादरम्यान शेतकऱ्यांना देखील सवलतीच्या दरात रोपांचे वितरण केले जाते. त्यामुळे नर्सरीतून लाखो रोपांची मागणी असते. पावसाळ्यापूर्वीच दोन महिने रोप निर्मितीला सुरुवात केली जाते. मच्छे येथील वनखात्याच्या नर्सरीत विविध रोपे तयार केली जात आहेत. विशेषत: वनरोपांना अधिक प्राधान्य दिले जाते. त्याबरोबर इतर रोपांची निर्मितीही केली जाते. वन खाते वन्य प्रदेशात तर सामाजिक वनीकरण विभाग मानवी वस्तीत रोपांची लागवड करते. यंदा वन खात्याने समाधानकारक पावसाची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे वन खाते देखील अधिक रोपे लावण्याच्या मानसिकतेत आहे.

येत्या पावसाळ्यात लागवड

बेळगाव विभागामध्ये मच्छे येथील नर्सरीमध्ये रोपांची निर्मिती केली जात आहे. येत्या पावसाळ्यात ही रोपे लावली जाणार आहेत. वन्य रोपांची निर्मिती केली जात आहे. प्लास्टिक पिशव्या आणि रोपवाटीकेमध्ये लागवड होत आहे. येत्या पावसाळ्यात जून,जुलै आणि ऑगस्ट दरम्यान ही लागवड केली जाणार आहे. लाखो रोपांची निर्मिती होणार आहे.

- पुरुषोत्तम रावजी-आरएफओ

Advertisement
Advertisement
Tags :

.